जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील पल्हालन पट्टणमध्ये ग्रेनेड हल्ला झाला आहे. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पल्हान चौकात संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट केल्याने दोन CRPF जवान जखमी झाले असून यादरम्यान दोन CRPF कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. CRPF पथकावर ग्रेनेड फेकला गेला आहे. या घटनेत सीआरपीएफचे दोन जवान आणि एका नागरिकाला छर्रे लागले. Blast in north kashmirs pattan palhalan areas 2 civilian injured
वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील पल्हालन पट्टणमध्ये ग्रेनेड हल्ला झाला आहे. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पल्हान चौकात संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट केल्याने दोन CRPF जवान जखमी झाले असून यादरम्यान दोन CRPF कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. CRPF पथकावर ग्रेनेड फेकला गेला आहे. या घटनेत सीआरपीएफचे दोन जवान आणि एका नागरिकाला छर्रे लागले.
या सर्वांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कर समर्थित दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला. कमल कोट उरी भागात जवानांनी संशयास्पद हालचाल पाहिल्यानंतर गोळीबार करण्यात आला. सैन्याने शोध मोहीम सुरू केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादांवर कारवाई सुरूच आहे. अलीकडेच, श्रीनगरच्या हैदरपोरा भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार झाले.. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या एसओजीने गुप्त माहितीच्या आधारे हायपेरोपोराजवळील निवासी भागाला वेढा घातला होता. येथे दोन दहशतवादी अडकल्याचे मानले जात होते, आता दोघांनाही सुरक्षा दलांनी ठार केले आहे. अलीकडेच गुप्तचर यंत्रणांनी खोऱ्यातील दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. तयार करण्यात आलेल्या 38 दहशतवाद्यांच्या यादीत 27 दहशतवादी लश्करचे असून उर्वरित 11 जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App