विशेष प्रतिनिधी
चेन्नई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी अन्नामलाई यांची नियुक्ती झाली आहे.BJP’s Tamil Nadu state president K. Annamalai, L. Murugan resigns after made minister
मुरुगन यांना माहिती आणि प्रसारण विभागाच्या राज्य मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले अन्नामलाई हे माजी आयपीएस अधिकारी आहेत.
ते भाजपाचे तामीळनाडू उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. अन्नामलाई यांनी तामीळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऑगस्ट २०२० मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. अर्वाकुरिची विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढली होती.
मात्र, त्यांचा पराभव झाला. मात्र, आपल्या विविध वक्तव्यांनी ते चांगलेच प्रसिध्दीस आले होते. त्यामुळेच पक्षात येऊन वर्षही झालेले नसताना केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. भाजपाने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App