विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : तेलंगणात भाजपला बहुमत मिळाले तर मुस्लिम धर्मियांचे 4 % आरक्षण रद्द करू पण दलित आणि आदिवासींचे आरक्षण वाढविले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. तेलंगणातील जानगाव येथे आयोजित रॅलीत ते बोलत होते. BJP will abolish 4 percent Muslim reservation, but increase SC, ST reservation
भाजपला सत्ता मिळाल्यास तेलंगणातील 4 % टक्के मुस्लिम आरक्षण रद्द करण्यात येईल. केसीआर सरकारने केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्यासाठी तेलंगणात मुस्लिम आरक्षण दिले, पण दलित आणि आदिवासींवर अन्याय केला. भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर तेलंगणातले मुस्लिम आरक्षण रद्द करून दलित आणि आदिवासी आरक्षणाचा टक्का वाढवू, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले. भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर येथील जनतेला अयोध्येत भगवान श्रीरामाचे दर्शन मोफत देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी केले.
अमित शाहांनी भारत राष्ट्र समितीच्या नेतृत्वाखालील केसीआर सरकारमधील भ्रष्टाचारावर हल्ला केला आणि त्यांच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल, असेही सांगितले. ज्याने भ्रष्टाचार केला असेल तो तुरुंगात जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने झपाट्याने प्रगती केली आहे. ओवेसींच्या भीतीने केसीआर हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवस साजरा करत नाहीत. केसीआर यांनी दिलेले वचन मोडल्याचा आरोपही त्यांनी केला. जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात ते काम करत आहेत. त्यांचे आमदार फक्त जमिनीवर कब्जा करतात. भाजप घराणेशाही करत नाही, मात्र येथील तिन्ही पक्षांमध्ये घराणेशाही शिगेला पोहोचली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App