भारत ‘गुजरात ते बंगाल’ असे वर्णन करणाऱ्या त्यांच्या एका ट्विटमुळे राहुल गांधी वादात सापडले आहेत. आसाम भाजपतर्फे राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे. एएनआय न्यूज एजन्सीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या त्या ट्विटसाठी भाजपकडून 14 फेब्रुवारीला आसाममध्ये किमान एक हजार देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातील. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता. BJP to file sedition case against Rahul Gandhi in Assam
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत ‘गुजरात ते बंगाल’ असे वर्णन करणाऱ्या त्यांच्या एका ट्विटमुळे राहुल गांधी वादात सापडले आहेत. आसाम भाजपतर्फे राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे. एएनआय न्यूज एजन्सीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या त्या ट्विटसाठी भाजपकडून 14 फेब्रुवारीला आसाममध्ये किमान एक हजार देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातील. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता.
याआधी रविवारी आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला होता. हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाषा 1947 पूर्वी जिनांच्या भाषेसारखीच आहे, असे वादग्रस्त विधान केले होते. आसामचे मुख्यमंत्री इथेच न थांबता राहुल गांधींमध्ये जिनांचं भूत शिरलं असल्याचं म्हटलं आहे. सीएम हिमंता बिस्वा सरमा यांनी खिल्ली उडवली आणि म्हटले की, काँग्रेस नेते राहुल गांधींना फक्त गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत भारत वाटतो. राहुल गेल्या 10 दिवसांत काय बोलतात ते पाहत आहेत.
BJP Assam to file sedition cases against Rahul Gandhi over his 'India exists from Gujarat to Bengal' remark: Sources Read @ANI Story | https://t.co/vsEr6TVUb2#Assam #BJP pic.twitter.com/7WFty7Ss49 — ANI Digital (@ani_digital) February 13, 2022
BJP Assam to file sedition cases against Rahul Gandhi over his 'India exists from Gujarat to Bengal' remark: Sources
Read @ANI Story | https://t.co/vsEr6TVUb2#Assam #BJP pic.twitter.com/7WFty7Ss49
— ANI Digital (@ani_digital) February 13, 2022
राहुल गांधींवर ताशेरे ओढताना केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनीही काँग्रेसच्या नेत्यासाठी भारत पश्चिम बंगालमध्ये संपतो, असे म्हटले होते! माझ्या अरुणाचल प्रदेश या सुंदर राज्यासह भारताचा ईशान्य भाग हा भारताबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाचा भाग नाही. आता राहुल गांधींच्या या ट्विटवर भाजप त्यांच्यावर आसाममध्ये देशद्रोहाचा खटला दाखल करणार आहे.
रविवारी राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. बँक घोटाळ्यावर हल्लाबोल करताना ते म्हणाले होते की, 75 वर्षात देशातील जनतेच्या पैशावर एवढी हेराफेरी कधीच झाली नव्हती. मोदींच्या काही मित्रांनाच अच्छे दिन आले आहेत, असेही ते म्हणाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App