विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका अजून जाहीर व्हायच्या असल्या तरी भाजपने पहिल्या दोन टप्प्यांमध्ये तब्बल 78 उमेदवार जाहीर केले आहेत, पण काँग्रेसचे उमेदवार मात्र अजूनही वेगवेगळ्या याद्यांमध्येच अडकले असल्याच्या बातम्या आहेत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका काँग्रेस जिंकणार असल्याचा आत्मविश्वास राहुल गांधींनी जाहीर केला आहे. पण हा आत्मविश्वास मुलाखतीपुरताच असल्याचे दिसते आहे. कारण तिथे काँग्रेस अद्याप एकही उमेदवार जाहीर करू शकलेली नाही. BJP released 78 candidates list in madhya Pradesh, but Congress list get stuck in multiple choices
त्या उलट भाजपने 78 उमेदवारांमध्ये 3 केंद्रीय मंत्री आणि 7 खासदार यांना उमेदवारी देऊन मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मोठे फेरबदल करण्याचे आधीच सूचित केले आहे. अजून 152 जागांवरच्या उमेदवारी जाहीर व्हायचे आहेत, पण भाजपने एवढी मोठी आघाडी घेतली असताना काँग्रेसचे उमेदवार मात्र अद्याप ठरायचे आहेत.
काँग्रेसने केलेल्या सर्वेक्षणातून आणि संघटनेने दिलेल्या नावांमधून एकाच जागेवर वेगवेगळ्या उमेदवारांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते गोंधळात पडले आहेत. प्रत्येक जागेवर उमेदवारांचे एक पॅनल तयार करून ती यादी काँग्रेस हायकमांड कडे पाठविण्याचे प्रदेश स्तरावर घाटत आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ आणि प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी यादीवर अंतिम हात फिरवल्यानंतर ती यादी हायकमांड कडे पाठविली जाईल आणि मगच उमेदवारांची घोषणा होईल, असे नेते सांगत आहेत.
पण एकीकडे भाजपने 78 उमेदवार जाहीर केल्यानंतर काल सोमवारी काँग्रेसच्या मध्य प्रदेश निवडणूक समितीची पहिली बैठक दिलीत पार पडली. त्यावेळी देखील उमेदवारांची कच्ची यादीही या बैठकीत सादर झाली नव्हती. कारण सर्वेक्षणात आलेले नाव वेगळे आणि मध्य प्रदेश काँग्रेस समितीने ठरविलेले नाव वेगळे यामुळे घोळ वाढला आहे.
वास्तविक मध्य प्रदेशात गेल्या 20 वर्षांमध्ये शिवराज सिंह चौहान यांची राजवट आहे. त्यामुळे मध्य प्रदेश भाजप सरकारला अँटी इन्कमबन्सी फॅक्टरचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे खरंतर उमेदवार निवडीचा यक्षप्रश्न भाजपला भेडसावायला हवा होता. पण प्रत्यक्षात तो काँग्रेसलाच भेडसावत आहे.
कारण अँटी इन्कमबन्सी फॅक्टर वर मात करण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी 3 केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, फग्गनसिंग कुलास्ते आणि प्रल्हाद सिंह पटेल यांना विधानसभा निवडणुकीची तिकिटे देऊन मैदानात उतरवले आहे. त्यांच्याबरोबर 7 विद्यमान खासदारांनाही विधानसभा निवडणुकीची तिकीट दिली आहेत.
इतके सगळे असताना काँग्रेसला मात्र अँटी इन्कमबन्सीचा सामना करावा न लागताच पक्ष अजूनही कन्फ्युजन स्टेट मध्ये आहे. काँग्रेस तिथे एकही उमेदवार अजून जाहीर करू शकलेली नाही. वास्तविक मध्य प्रदेश काँग्रेसची सूत्रे कमलनाथ यांच्या समर्थ हातांमध्ये आहे. पण काँग्रेस हायकमांडचा पायगुंता मध्य प्रदेशात अडकल्याने त्यांना फारशा हालचाली करता येत नाहीत. दिग्विजय सिंह फॅक्टर त्यांना सतावतो आहे. त्यामुळे अजून तरी मध्य प्रदेश काँग्रेसचे उमेदवार वेगवेगळ्या याद्यांमध्येच अडकून पडले आहेत. राहुल गांधींची महत्त्वाकांक्षा मात्र काँग्रेस मध्य प्रदेशात विजयी करण्याची आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App