हरियाणा काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या चर्चा रंगत आहेत.
विशेष प्रतिनिधी
चंदीगड : हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान, राज्यात काँग्रेसशी संबंधित मोठ्या बातम्या समोर येत आहेत. भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्याशी सुरू असलेल्या मतभेदांदरम्यान भाजपने काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा ( Kumari Shailaja ) यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे वृत्त आहे. अशा स्थितीत भाजप हरियाणात खेला करण्याची तयारी करत आहे का?, असे शैलजा भाजपमध्ये येणार? हुड्डा आणि शैलजा यांच्यातील मतभेदामुळे काँग्रेसचे जहाज बुडेल का? प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हरियाणा निवडणुकीतील संपूर्ण राजकारण सध्या काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा यांच्याभोवती फिरत आहे. हरियाणात भाजप मोठा खेला करण्याच्या तयारीत आहे. भाजपने कुमारी शैलजा यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे वृत्त आहे.
माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, काँग्रेसमध्ये कुमारी शैलजा यांचा अपमान केला जात आहे. कुमारी शैलजा भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांवर खट्टर म्हणाले की, ही शक्यता नाकारता येत नाही. योग्य वेळी सर्व काही कळेल. तर, सर्व काही ठीक असून सर्वजण एकत्र निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसकडून येत आहे.
हरियाणा काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या चर्चा रंगत आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कुमारी शैलजा तिकीट वाटपात भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या गटातील लोकांना दिलेल्या पसंतीमुळे नाराज असून त्या अद्याप प्रचारासाठी गेल्या नसल्याचे वृत्त आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App