काँग्रेस कार्यकर्ते उपाशी बसले होते आणि मग…
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : Haryana हरियाणात भारतीय जनता पक्ष सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांवर जनतेने मान्यतेचा शिक्का मारला आहे, असे हरियाणाचे ( Haryana ) मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी मंगळवारी सांगितले. मतदारांचे आभार व्यक्त करताना सैनी म्हणाले की, याचे संपूर्ण श्रेय मी मोदीजींना देतो. त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हरियाणातील जनतेने सरकारच्या धोरणांना मान्यता दिली आहे. भाजपच्या या विजयाचा जल्लोष पक्ष कार्यकर्ते करत आहेतHaryana
हरियाणामध्ये भाजपने विजय मिळविला, तेव्हा आसाममध्येही जल्लोष झाला. भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करताना आसाममधील लखीमपूर मतदारसंघातील भाजप आमदार मानव डेका यांनीही काँग्रेस कार्यालयात मिठाई पाठवल. मिठाई पाठवल्यानंतर मानव डेका म्हणाले की, कोणीही उपाशी झोपणार नाही, ही मोदींची हमी आहे.
भाजप आमदार मानव डेका म्हणाले की, ‘भाजपच्या विजयापूर्वी काँग्रेसने बँड आयोजित केला होता आणि हॉटेलमधून जेवण ऑर्डर केले होते. मात्र निकाल भाजपच्या बाजूने येताच नेत्यांची पळापळ झाली आणि आलेले समर्थक अन्न-पाण्याविना निघून गेले. फोन येताच मी त्यांचा आमदार असल्याने चहा आणि मिठाई पाठवली.
वास्तविक आसाम काँग्रेसने लखीमपूरमध्ये हरियाणाचा विजय साजरा करण्याची योजना आखली होती. काँग्रेसने सकाळी 11 वाजता जल्लोष करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना तिथे बोलावण्यात आले. मात्र, निकाल जाहीर झाला तेव्हा लखीमपूरमध्ये जल्लोष नव्हता. उपाशी कार्यकर्ते काँग्रेस नेत्यांची वाट पाहत राहिले. त्यानंतर भाजप आमदाराने कार्यकर्त्यांना उपाशी राहू नये म्हणून मिठाईचे 4 बॉक्स काँग्रेस मुख्यालयात पाठवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App