मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या भारतीय जनता पक्षात फार मोठे फेरबदल होत आहेत. पण या फेरबदलांमध्ये ना बंड, ना आदळआपट, तर सहज सांधा बदल होत आहे. इथे काँग्रेसची पठडीतला मंत्रिमंडळ बदलातला “खांदेपालट” हा शब्द वापरण्याची गरज नाही. कारण काँग्रेसमध्ये रूढ झालेली राजकीय संस्कृती अजून भाजपमध्ये रुजलेली नाही. काँग्रेसमध्ये विधानसभेच्या एकेका तिकिटासाठी नंतर मंत्री पदासाठी एवढा झगडा चालतो आणि तोही चव्हाट्यावर येतो, की अनेकांना नको ती आमदारकी आणि नको ती मंत्रीपद असे वाटायला लागते. जनतेमध्ये तर काँग्रेसची प्रतिमा अंतर्गत भांडकुदळ पक्ष अशीच झाली आहे. BJP makes significant smooth changes in madhya Pradesh, but could Congress and INDI alliance do it without quarrels??
… आणि काँग्रेसच्या त्याच “डीएनएची” लागण “इंडिया” आघाडीतल्या काँग्रेसही पठाडीतून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूळ काँग्रेस यांच्यासारख्या पक्षांना झाली आहे. त्यामुळे त्या पक्षांमध्येही एकेका तिकीटासाठी, मंत्रिपदासाठी भांडण चव्हाट्यावरचे भांडण ही नित्याची बाब आहे. त्यातली राष्ट्रवादी तर नेमकी खरी कोणाची राष्ट्रवादी या झगड्यात मश्गुल आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात भाजप जी राजकीय कात टाकतो आहे, तिचे वर्णन सहज सांधे बदल याच शब्दाने करता येऊ शकेल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आपण मध्य प्रदेशच्या जनतेचा लवकरच निरोप घेत असल्याचा सूचक संदेश देत आहेत, तर त्याचवेळी यशोधरा राजे सिंधिया यांनी शिवपरीतून आपण इथून पुढे निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर करून त्या निवडणुकीच्या रणमैदानातून बाजूला झाल्या आहेत. भाजपने हा सांधा बदल करताना आधीच 3 केंद्रीय मंत्री आणि 7 खासदार यांना तिकिटे देऊन विधानसभा रण मैदानात उतरवले आहेत, पण ते करताना सुद्धा केंद्रीय मंत्र्यांना आपले केंद्रीय मंत्री पद गमवावे लागेल. खासदारांना आपला मोठा मतदारसंघ गमवावा लागून आपले राजकारण विधानसभा मतदारसंघांपुरते सीमित करावे लागेल याची जाणीव शांतपणे पक्की करून देण्यात आली आहे आणि नेमका हाच तो सहज सांधा बदल आहे.
हा प्रयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यानच केला होता. गुजरातचे विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालचे अख्खे मंत्रिमंडळ विधानसभा निवडणुकीपासून दूर ठेवत पूर्णपणे नव्या चेहऱ्यांना संधी दिली आणि जुन्या मंत्रिमंडळातल्या सर्व नेत्यांना पक्ष संघटनात्मक कामे वाटून दिली. खुद्द विजय रुपाणी यांना पंजाबचे प्रभारीपद दिले. हा प्रयोग गुजरात मध्ये विलक्षण यशस्वी झाला. भाजपला तिथे 154 जागा मिळाल्या. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी या प्रयोगाचा हवाला देऊन असला प्रयोग मध्य प्रदेशात यशस्वी होणार नसल्याचा दावा केला आहे.
अर्थात तो जसाच्या तसा प्रयोग मध्य प्रदेशात होईल आणि तो यशस्वी होईल असे मानायचे कारण नाही, पण जो सहज सांधे बदलाचा प्रयोग भाजप करू शकते तो प्रयोग काँग्रेस राष्ट्रवादी तृणमूळ किंवा अन्य कोणतेही प्रादेशिक पक्ष करण्याची क्षमता राखत नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो दिग्विजय सिंह यांच्यासारख्या नेत्याच्या पचनी पडणे अवघड आहे.
कारण भाजपचे आज राजकारण जेवढे प्रवाही आहे, तेवढे काँग्रेस सह कोणत्याच पक्षाचे राजकारण प्रवाही उरलेले नाही. किंबहुना 2014 आणि 2019 च्या पराभवानंतर काँग्रेस आणि इतर पक्षांना आपल्या राजकारणाला प्रवाही करण्याची फार मोठी संधी उपलब्ध होती. गेल्या 3 – 4 वर्षांमध्ये जर प्रामाणिक आणि गंभीर प्रयत्न केले असते, तर ते काँग्रेसला साध्य देखील झाले असते. पण भारत जोडो यात्रा किंवा रोजच्या पत्रकार परिषदा असल्या प्रकारातून काँग्रेसला संजीवनी देण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात पक्षाला फार मर्यादित यश मिळाले. त्यामुळे काँग्रेसला ना जुने नेते बदलता आले, ना जुने कार्यकर्ते चार्ज करता आले. नवीन कार्यकर्त्यांची भरती हा तर काँग्रेस आणि “इंडिया” आघाडीतल्या घटक पक्षांना बिलकुलच माहिती नसलेला विषय आहे.
जुनीच साधन सामग्री सामग्री, जुन्याच आयडिया आणि जुनाट सैन्य या आधारावर काँग्रेस आणि “इंडिया” आघाडी मोदींशी मुकाबला करू बघत आहेत, पण मोदी मात्र सैन्य आणि साधन सामग्री यात बदल करून नव्याने मैदानात उतरत आहेत. हा खरं म्हणजे काँग्रेस आणि “इंडिया” आघाडीतल्या घटक पक्षांसाठी “लर्निंग एक्सपिरीयन्स” ठरला पाहिजे, पण तो तसा ठरत नाही. काँग्रेस सह प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची काहीही नवे शिकण्याची तयारी नाही. उलट काँग्रेस आणि बाकीचे प्रादेशिक पक्ष आपली घराणेशाहीची पठडी मोडायला तयार नाहीत आणि त्यातच त्यांच्या पराभवाची खरी बीजे दडली आहेत.
मोदी – शाहांच्या भाजपमध्ये आज ना बंड, ना आदळ आपट, सहज सांधे बदल हे शक्य आहे. पण काँग्रेस आणि बाकीच्या प्रादेशिक पक्षांमध्ये ते बिलकुलच शक्य नाही, हाच 2023 मधल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा “लसावि” आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App