विशेष प्रतिनिधी
भोपाळ : भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी भोपाळमध्ये मीडियासोबत संवाद साधताना सरकारी अधिकाऱ्यांवर केलेल्या वक्तव्यामुळे आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. सरकारी अधिकारयांवर निशाणा साधताना भाजपच्या वरिष्ठ नेत्या म्हणाल्या की, सरकारी अधिकारी राजकारण्यांची चप्पल उचलण्याचेचं काम करतात. राजकीय नेत्यांचे सरकारी अधिकाऱ्यांवर पूर्णपणे नियंत्रण असते. मी अकरा वर्ष केंद्रामध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. कोणत्याही मुद्द्यावर आधी राजकीय पक्षांशी चर्चा व्हायची, आणि त्यांनंतर आमच्या आदेशानुसार सरकारी अधिकारी फाईल्स बनवून आम्हाला द्यायचे. आम्ही सरकारी अधिकार्यांना पगार देतो, ना की सरकारी अधिकारी आम्हाला पगार देतात.’
Bjp leader uma bharti says bureaucrats only pick our slippers!! K K Mishra demands clarification on this shameful statement
तर तुम्हीच सांगा सरकारी अधिकारी नेत्यांवर कसे काय बरं नियंत्रण ठेवतात? असा उलट प्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला होता. उमा भारती यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस के के मिश्रा यांनी टीका केली आहे. उमा भारती यांचे हे वाक्य अतिशय लज्जास्पद असून हे वक्तव्य अत्यंत खेदकारक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान त्यांच्याकडे उमा भारती यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण मागितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App