राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी प्रमुख रेखा शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
चंदीगड : Haryana राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी प्रमुख आणि भाजपच्या उमेदवार रेखा शर्मा यांनी मंगळवारी हरियाणामधून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. रेखा शर्मा या एकमेव उमेदवार मैदानात असल्याने त्यांची बिनविरोध निवड होणे निश्चित आहे.Haryana
हरियाणा विधानसभा सचिवालयात पोटनिवडणुकीसाठी शर्मा यांनी रिटर्निंग ऑफिसरसमोर उमेदवारी अर्ज सादर केला तेव्हा मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बडोली, मंत्री कृष्ण लाल पनवार हे उपस्थित होते.
उमेदवारी दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रेखा शर्मा म्हणाल्या की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, मनोहर लाल आणि नायब सिंग सैनी यांना पुन्हा एकदा देशसेवा करण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. नरेंद्र मोदी सरकारने महिला सक्षमीकरणासाठी आणलेल्या अनेक उपक्रम आणि योजनांचाही त्यांनी उल्लेख केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App