राहुल गांधींच्या मते मोदी “पनौती”, मग इंदिरा गांधी कोण??; भाजपचा बोचरा सवाल!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिल्याने भारताचा पराभव झाला. ते पनौती आहेत, असा “जावई शोध” अद्याप कोणाचेच अधिकृत जावई नसलेल्या राहुल गांधींनी लावला आता त्यावरून मोदी जर “पनौती” असतील, तर मग इंदिरा गांधी कोण होत्या??, असा बोचरा सवाल भाजपने केला आहे. या सवालाच्या पुराव्यासाठी भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. bjp amit malviya mocks rahul gandhi shares old video pakistan hockey team player interview

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात उपस्थित होते म्हणून भारताचा पराभव झाला. ते भारतीय संघासाठी पनौती ठरले, अशी टीका राहुल गांधींनी राजस्थानातल्या बारमेरमध्ये काँग्रेसच्या प्रचार सभेत केली.

त्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपने एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यावर राहुल गांधींनाच उलटा प्रश्न केला आहे.

१९८२ चा हॉकी अंतिम सामना आणि इंदिरा गांधींची उपस्थिती!

भाजपाच्या मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यासंदर्भात एक जुना व्हिडीओ शेअर करून त्यावरून राहुल गांधींना खोचक प्रश्न केला आहे. पाकिस्तानच्या हॉकी संघातील एका सदस्याच्या एका मुलाखतीमधला हा व्हिडीओ असून 1982 सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या अंतिम सामन्याचा प्रसंग ते मुलाखतीत सांगताना दिसत आहेत.

आम्ही भारतात आशियाई क्रीडा स्पर्धा खेळलो. तो आमच्यासाठी संस्मरणीय क्षण होता. दिल्लीत 1982 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आम्ही भारताविरुद्ध अंतिम सामना खेळलो. त्या सामन्याला त्यांच्या पंतप्रधान इंदिरा गांधीही उपस्थित होत्या. आम्ही हा सामना 7 – 1 ने जिंकला. पण पाकिस्तानने 5 गोल झाल्यानंतर इंदिरा गांधी निघून गेल्या होत्या. भारतात भारताला हरवणं हा आमच्यासाठी मोठा क्षण होता”, असे ते मुलाखतीत सांगत आहेत.

अमित मालवीयांचा राहुल गांधींना सवाल!

दरम्यान, या व्हिडीओबरोबर अमित मालवीय यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ते वर्ष होते 1982. नवी दिल्लीमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीचा अंतिम सामना खेळत होता. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. तो सामना भारतानं पाकिस्तानविरुद्ध 1 – 7 असा गमावला. पाकिस्तानने 5 गोल केल्यानंतर इंदिरा गांधी मैदानातून निघून गेल्या. त्या शेवटपर्यंत सामना पाहायला थांबल्या नाहीत. मग राहुल गांधींच्या मते इंदिरा गांधींना काय म्हणायचे??, असा सवाल अमित मालवीय यांनी केला आहे. काँग्रेसने या सवालाला अद्याप उत्तर दिलेले नाही.

bjp amit malviya mocks rahul gandhi shares old video pakistan hockey team player interview

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात