विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात प्रथमच माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अशा प्रकारच्या घटना या दुर्मिळ असून लोकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नसल्याचे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. Bird flue is not dangerous for human
यंदा जानेवारी महिन्यात अनेक भागांत बर्ड फ्लूने डोके वर काढल्यानंतर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाना आणि छत्तीसगडमधील पोल्ट्री चालकांना लाखो पक्ष्यांची कत्तल करावी लागली होती. बर्ड फ्लूच्या विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने स्थलांतरित पक्ष्यांमुळे होतो असे गुलेरिया यांनी स्पष्ट केले.
या विषाणूंचा पक्ष्यांपासून माणसाला संसर्ग होण्याचा धोका फार कमी असून माणसापासून माणसाला त्याची बाधा होण्याची अद्याप एकही घटनासमोर आलेली नाही, त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नसल्याचे गुलेरिया यांनी सांगितले.
‘‘ कोंबडीचे मांस किंवा अंडी खाण्यापूर्वी ती योग्यरीत्या शिजवून घ्यायला हवीत. अशाप्रकारे शिजविलेल्या मांसातून विषाणूची बाधा झाल्याची कोणतीही घटना उघड झालेली नाही. तुम्ही मांस शिजवता तेव्हाच त्यातील विषाणू मरण पावतात. बाधित कोंबड्या, आजारी किंवा मरण पावलेल्या कोंबड्यांपासून मात्र दूर राहायला हवे.’’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App