कोणत्याही सेलिब्रिटीला आमंत्रित केले जाणार नाही, कारण काय?
विशेष प्रतिनिधी
प्रयागराज: Gautam Adanis अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत याचे लग्न पुढील महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हे लग्न साध्या पद्धतीने होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नात कोणत्याही सेलिब्रिटीला आमंत्रित केले जाणार नाही. मंगळवारी प्रयागराज महाकुंभात गंगा नदीत स्नान करण्यासाठी आपल्या कुटुंबासह आलेले अदानी, सुरत येथील हिरे व्यापारी जैमिन शाह यांची मुलगी दिवा शाह यांच्याशी त्यांचा मुलगा जीतच्या लग्नाबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, ते सामान्य लोकांसारखेच एक सामान्य लग्न.Gautam Adanis
Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधी वरून खर्गे – पवार वाद; पण कुणी कुणाचा, का केला विश्वासघात??
प्रयागराजमधील त्रिवेणी संगम येथे आपल्या कुटुंबासह गंगा आरती केल्यानंतर गौतम अदानी म्हणाले की, त्यांचे संगोपन सामान्य माणसासारखे झाले आहे. गंगा मातेच्या आशीर्वादामुळेच जीत देखील येथेच आहे. हे लग्न सामान्य आणि पारंपारिक पद्धतीने होईल. त्यांनी सांगितले की लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रीती अदानी, मुले करण आणि जीत, सून परिधी आणि नात कावेरी होती.
महाकुंभात, अदानी कुटुंबाने इस्कॉनमधील महाप्रसाद सेवेत सहभागी झाल्यानंतर हनुमान मंदिरात प्रार्थना केली. या महाप्रसाद सेवेत, अदानी ग्रुप दररोज एक लाखाहून अधिक लोकांना मोफत जेवण वाटप करत आहे. गौतम अदानी यांनी गंगेच्या काठावर असलेल्या शंकर विमानमंडपम मंदिरातही पूजा केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App