म्हणाले- एआयच्या मदतीने सर्व सभागृह एकाच प्लॅटफॉर्मवर आणली जातील
विशेष प्रतिनिधी
पटना : Om Birla लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘एक राष्ट्र-एक विधान मंच’ ही संकल्पना मांडली आणि २०२५ पर्यंत सर्व राज्य सभागृहे एकाच व्यवस्थेखाली आणण्याबद्दल ते बोलले.Om Birla
पटना येथे पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करताना, बिर्ला यांनी विश्वास व्यक्त केला की २०२५ मध्ये देशातील नागरिकांना अशा व्यासपीठावर प्रवेश मिळेल जिथे ते केवळ कीवर्ड, मेटा डेटा आणि सुधारित एआयद्वारे कोणत्याही विषयावरील संसदेच्या अहवालाचा केवळ शोध घेऊ शकणार नाहीत. तर संसदेच्या अहवालाचे निकाल , चर्चा अन् कायदेमंडळांमधील वादविवादही बघू शकतील.
ओम बिर्ला म्हणाले की, संसद १९४७ पासून आजपर्यंतच्या संसदीय वादविवादांना संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध असलेल्या २२ भाषांमध्ये उपलब्ध करून देईल. सध्या, एआयच्या मदतीने, संसदेत दहा भाषांमध्ये एकाच वेळी भाषांतर केले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App