विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशात कॉँग्रसेने १२५ उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये ४० टक्के महिला आहेत. त्यापैकीच एक चक्क दक्षिणेतील बिकिनी गर्ल म्हणून प्रसिध्द असलेली अभिनेत्री आहे. तिने ग्रेट ग्रॅँड मस्ती या चित्रपटातही काम केले आहे.Bikini Girl from the South will contest as Congress candidate from Uttar Pradesh
उत्तर प्रदेशच्या कॉँग्रेस प्रभारी प्रियंका गांधी यांनी अभिनेत्री अर्चना गौतम या अभिनेत्रीला मेरठमधील हस्तिनापूरमधून तिकीट दिले आहे. अर्चना गौतम अभिनेत्री, मॉडेल आणि ब्युटी पेजेंट विजेता आहे. अर्चना २०१४ मध्ये मिस उत्तर प्रदेश बनली होती. त्यानंतर ती मिस बिकिनी इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया बनली होती.
तिने मिस कॉसमॉस वर्ल्ड २०१८ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.अर्चना गौतम हिने २०१५ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून पहिल्यांदा दिसली. त्यानंतर ती श्रद्धा कपूरच्या हसिना पारकर आणि बारात कंपनी या चित्रपटातही तिने काम केले होते.
त्यानंतर तिने आपला मोहरा दक्षिणेकडे वळविला. तामीळ आणि तेलगू चित्रपटांत ती काम करते. दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत तिला बिकिनी गर्ल म्हणून ओळखले जाते. ब्युटी पेजेंट जिंकल्यापासून अर्चना गौतम मॉडेलिंगच्या जगात कार्यरत आहेत. ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या जंक्शन वाराणसी चित्रपटामध्ये अर्चना गौतम हिने एक आयटम सॉँगही केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App