फक्त जातीच्या समीकरणावर निवडणूक लढा आणि हमखास पडा!!; बिहारने शिकवला धडा!!, असे म्हणायची वेळ विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी आणली.Bihar taught the lesson two casteist political parties
राहुल गांधींच्या काँग्रेसने आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने कितीही सामाजिक न्यायाच्या बाता मारल्या, तरी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुका केवळ जातीच्या समीकरणावरच लढविल्या होत्या हे सत्य लपून राहिले नाही. या दोन्ही पक्षांनी बिहार मधल्या मुस्लिम आणि यादव या दोन समूहांच्या बळावर राजकारण पुढे रेटले. पण तेच उलटून त्यांच्या अंगावर आले. हे आकडेवारीनिशी ठळकपणे सिद्ध झाले. लालूंच्या जंगल राज मध्ये जातीच्या राजकारणाने ज्या बिहारमध्ये धुमाकूळ घातला होता, त्याच बिहारने फक्त जातीच्या समीकरणावर निवडणूक लढा आणि हमखास पडा!!, हा धडा शिकवला. हे राजकीय सत्य बिहारमधल्या आकडेवारीने समोर आणले.
M + Y समीकरण नापास
बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने 144 जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी 51 जागांवर त्यांनी यादव जातीचे उमेदवार दिले. त्यापैकी फक्त 11 उमेदवारांना विजय मिळाला. याचा अर्थ राष्ट्रीय जनता दलाचे 40 यादव उमेदवार पराभूत झाले. त्या उलट भाजप आणि जनता दल युनायटेड यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 28 यादव उमेदवार दिले त्यापैकी 15 यादव उमेदवार जिंकून आले.
2020 च्या विधानसभा निवडणुकीत बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी 55 जागांवर यादव उमेदवार विजयी झाले होते. म्हणजेच बिहारमध्ये 2020 ते 2025 या 5 वर्षांमध्ये 55 यादव आमदार होते. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत जातीच्या राजकारणाच्या अतिरेकात फक्त 28 यादव आमदार निवडून येऊ शकले. याचा अर्थ यादव + मुस्लिम (M + Y)हे जातीचे समीकरण यादव राजकारण करणाऱ्यांना आधार देऊ शकले नाही.
– मुस्लिम आमदारांच्या संख्येतही घट
बिहारमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 17.6 % असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बिहार विधानसभेत मुस्लिम आमदारांची संख्या ही मोठा दबाव गट तयार होण्याइतपत मोठी असायची. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये 34 मुस्लिम आमदार होते. परंतु, टप्प्याटप्प्याने मुस्लिम आमदारांची संख्या घटत गेली. कारण जातीचे राजकारण करणारे पक्ष मुस्लिम लोकसंख्येला मतदार म्हणून गृहीत धरत आले. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात फक्त 11 मुस्लिम आमदार निवडून येऊ शकले.
लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने 18 मुस्लिमांना उमेदवारी दिली होती, त्यापैकी फक्त तीन मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकले. काँग्रेसने एकूण 61 जागा लढविल्या, त्यापैकी 10 मुस्लिमांना त्यांनी उमेदवारी दिली. त्यापैकी फक्त दोन उमेदवार निवडून येऊ शकले.
बिहारच्या पूर्वांचल मध्ये 2020 च्या निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM या पक्षाचे पाच आमदार निवडून आले होते त्यापैकी चौघेजण नंतर राष्ट्रीय जनता दलात सामील झाले. पण 2025 च्या निवडणुकीत AIMIM पक्षाने ती कसर भरून काढली आणि पुन्हा 5 आमदार निवडून आणले.
– AIMIM ने जागा राखल्या
असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या दोन्ही पक्षांना आघाडी करायची ऑफर दिली होती परंतु दोन्ही पक्षांनी स्वतःच्या मुस्लिम यादव समीकरणावर जास्त विश्वास ठेवला आणि ओवैसी यांची ऑफर धुडकावली. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या दोन्ही पक्षांनी ओवैसी यांना कडवा प्रतिस्पर्धी मानले. तिथेच दोन्ही पक्ष फसले आणि त्यांचे मुस्लिम + यादव (M+Y) समीकरण उधळले गेले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App