जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय नौदल ( Indian Navy ) आणि डीआरडीओने गुरुवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर प्रक्षेपित केलेल्या शॉर्ट रेंजच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही उड्डाण चाचणी आयटीआर रेंज लाँचरवरून घेण्यात आली, ज्यामध्ये कमी उंचीवर उड्डाण करणाऱ्या हाय-स्पीड एअर टार्गेटला लक्ष्य करण्यात आले. याबाबत माहिती देताना संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, क्षेपणास्त्र यंत्रणेने लक्ष्य शोधून ते अचूक टिपले
यासोबत असे म्हटले आहे की, “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय नौदलाने ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) वरून वर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाइल (VL-SRSAM) ची चाचणी केली आहे. उड्डाणाची यशस्वी चाचणी झाली.” मंत्रालयाने सांगितले की चाचणीचे उद्दिष्ट ‘प्रॉक्सिमिटी फ्यूज’ आणि ‘सीकर’ यासह शस्त्र प्रणालीच्या अनेक अद्ययावत घटकांचे प्रमाणीकरण करणे आहे.
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “रडार इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि आयटीआर चांदीपूर येथे तैनात केलेल्या टेलीमेट्री यासारख्या विविध उपकरणांद्वारे सिस्टमच्या कामगिरीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले गेले आणि त्याची पुष्टी केली गेली. डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि भारतीय नौदलाच्या प्रतिनिधींनी प्रक्षेपणाचे निरीक्षण केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि भारतीय नौदलाच्या संघांचे त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले आणि म्हटले की चाचणी VL-SRSAM शस्त्र प्रणालीची विश्वासार्हता आणि परिणामकारकता पुष्टी करते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App