Shopian Encounter : जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये एन्काउंटरदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या एन्काउंटरमध्ये जवानांनी बुऱ्हान वानीचा चुलत भाऊ इम्तियाज शाहचा खात्मा केला आहे. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांत शोपियांमध्ये कालपासून एन्काउंटर सुरू होते. या मोहिमेत सुरक्षा दलाने 5 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे. ठार झालेला कुख्यात दहशतवादी इम्तियाज शाह हा गजवा-ए-हिंदचा कमांडर होता. घटनेनंतर जवानांनी परिसरात शोध मोहीम आणखी वेगवान केली आहे. Big Breaking Shopian Encounter Burhan Wani’s brother killed by security forces
वृत्तसंस्था
जम्मू कश्मीर : जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये एन्काउंटरदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या एन्काउंटरमध्ये जवानांनी बुऱ्हान वानीचा चुलत भाऊ इम्तियाज शाहचा खात्मा केला आहे. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांत शोपियांमध्ये कालपासून एन्काउंटर सुरू होते. या मोहिमेत सुरक्षा दलाने 5 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे. ठार झालेला कुख्यात दहशतवादी इम्तियाज शाह हा गजवा-ए-हिंदचा कमांडर होता. घटनेनंतर जवानांनी परिसरात शोध मोहीम आणखी वेगवान केली आहे.
#UPDATE | Shopian encounter: Another unidentified terrorist killed, a total of 5 terrorists neutralised. Search is underway. — ANI (@ANI) April 9, 2021
#UPDATE | Shopian encounter: Another unidentified terrorist killed, a total of 5 terrorists neutralised. Search is underway.
— ANI (@ANI) April 9, 2021
काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी त्रालमधील चकमकीदरम्यान अन्सार गजवात-उल-हिंद एजीएचचा कमांडर इम्तियाज शाह हा ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुरक्षा दलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोपियांच्या जान मुहल्लामध्ये सुरू असलेल्या चकमकीत पाच, तर त्रालमध्ये 2 दहशतवादी ठार झाले आहेत.
या चकमकींमध्ये सैन्यातील एका अधिकाऱ्यासमवेत चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारांसाठी सैन्याच्या 92 बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Big Breaking Shopian Encounter Burhan Wani’s brother killed by security forces
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App