लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका, खासदार परनीत कौर यांचा भाजपमध्ये प्रवेश

परनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि खासदार परनीत कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप त्यांना पटियाला मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकते, असे मानले जात आहे. याविषयी बऱ्याच दिवसांपासून चर्ची सुरू होती, दरम्यान, मुलगी जयेंद्र कौरने नुकतेच एका वक्तव्यात स्पष्ट केले होते की, तिची आई परनीत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.Big blow to Congress in Punjab before Lok Sabha elections MP Parneet Kaur joins BJP



अखेर पटियालाच्या खासदार परनीत कौर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली. त्यानंतर लगेचच कौर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीदरम्यान परनीत कौर यांचा भाजपमध्ये प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.

परनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. पंजाबमधील ‘रॉयल ​​सीट’ पटियाला येथून त्या चार वेळा काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी आता भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली आहे. कौर गेल्या 25 वर्षांपासून पटियाला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Big blow to Congress in Punjab before Lok Sabha elections MP Parneet Kaur joins BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात