मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका, सहावेळा आमदार झालेले रामनिवास रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश!

शेकडो समर्थकांसह श्योपूर येथील जाहीर सभेत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि सहावेळा काँग्रेसचे आमदार रामनिवास रावत यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री मोहन यादव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या उपस्थितीत त्यांनी श्योपूर येथील जाहीर सभेत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.Big blow to Congress in Madhya Pradesh Ramniwas Rawat six time MLA, joins BJP



विशेष म्हणजे रामनिवास रावत जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करत होते, त्याचवेळी राहुल गांधी शेजारच्या भिंड जिल्ह्यात निवडणूक प्रचारादरम्यान एका सभेला संबोधित करत होते.

रामनिवास रावत यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष मुकेश नायक म्हणाले की, प्रत्येकामध्ये संघर्ष करण्याची ताकद आणि राजकीय विचारांना चिकटून राहण्याची क्षमता नसते. रामनिवास रावत यांनी सौदेबाजीमुळे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना मंत्री बनवण्याचा निर्णय घेतल्याचे सर्वांनाच माहीत आहे. त्या आधारावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Big blow to Congress in Madhya Pradesh Ramniwas Rawat six time MLA, joins BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात