Biden : बायडेन यांनी 4 वर्षांत तब्बल 532 दिवस घेतल्या सुट्या, अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक सुट्या घेणारे राष्ट्राध्यक्ष

Biden

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन  ( Biden ) यांनी त्यांच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात 532 दिवसांची रजा घेतली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, 81 वर्षीय बायडेन यांना राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून 1326 दिवस झाले आहेत. बायडेन यांनी यापैकी 40% दिवस सुट्या घेतल्या आहेत, तर त्यांनी फक्त 794 दिवस काम केले आहे.

रिपोर्टनुसार, बायडेन दर 10 दिवसांतून 4 सुट्या घेत आहेत. अमेरिकेतील कोणत्याही व्यक्तीला दरवर्षी सरासरी 11 दिवसांची सुट्टी मिळते. यानुसार, एका सामान्य अमेरिकन व्यक्तीला जेवढ्या बायडेन यांनी 4 वर्षांत जितक्या सुट्या घेतल्या आहेत, तितक्या सुट्ट्या घेण्यासाठी 48 वर्षे लागतील.

अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने घेतलेली ही सर्वात जास्त रजा आहे. यापूर्वी, ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात 1461 पैकी 26% म्हणजे 381 दिवस सुट्टी घेतली होती. तर बराक ओबामा आणि रोनाल्ड रेगन त्यांच्या एकूण कार्यकाळाच्या केवळ 11% दिवसांच्या रजेवर होते. जिमी कार्टर यांनी केवळ 79 दिवसांची सुट्टी घेतली होती.



‘जगात गदारोळ, मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी घेतली विश्रांती’

जास्त रजा घेतल्याबद्दल बायडेन यांच्यावर टीका करताना ट्रम्प यांच्या कार्यकाळात व्हाईट हाऊसचे सल्लागार राहिलेले मार्क पाओलेटा म्हणाले की, “समुद्रकिनाऱ्यावर खुर्चीवर झोपलेले बायडेन यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. जगात सुरू असलेल्या गदारोळात बायडेन यांनी, त्यांची विश्रांती घेतानाची छायाचित्रे ही त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठी उदाहरणे आहेत.

बायडेन यांच्या सहायकांनी म्हटले आहे की जेव्हाही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सुट्टीवर गेले तेव्हा ते त्यांच्या कामाशी जोडलेले राहिले. त्यांना नियमितपणे तातडीचे कॉल येत होते आणि ते सहज संपर्कात होते. बायडेन हे अमेरिकेत अध्यक्षपद भूषवणारे सर्वात वयस्कर नेते आहेत. 80 वर्षीय डेमोक्रॅट नेत्याने 20 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून त्यांनी अमेरिकेत सत्ता मिळवली.

पीएम मोदींनी एकही रजा घेतली नाही

2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून पीएम मोदींनी एक दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 31 जुलै 2023 रोजी प्रफुल पी सारडा नावाच्या व्यक्तीने आरटीआय दाखल केला होता. यामध्ये मोदींनी पंतप्रधानपदाच्या दोन्ही कार्यकाळात किती दिवसांची रजा घेतली आहे, अशी विचारणा करण्यात आली होती.

यावर पीएमओने उत्तर दिले की, मोदींनी आतापर्यंत आपल्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतलेली नाही. ते नेहमी वेळेवर काम सुरू करतात. याशिवाय देश-विदेशातील 3 हजारांहून अधिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे

Biden took a whopping 532 days off in 4 years, the most vacations by a president in US history

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात