विशेष प्रतिनिधी
थिंफू : भूतानमध्ये राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचूक यांनी कोरोना नियंत्रणात सक्रिय पुढाकार घेतला आहे. सीमावर्ती भागांत ते स्वतः गस्त घालतात आणि चेकपोस्टवरील बंदोबस्ताची तपासणी करतात. Bhutan King alerts on border
कोरोना नियंत्रण, सीमेवरून परदेशी नागरिकांनी अवैध प्रवेश करू नये आणि एकूणच देशाची सुरक्षा असे त्यांचे उद्देश आहेत. त्यानुसार वांगचूक यांचा हा किमान १४वा दौरा आहे. यावेळी पंतप्रधान लोटाय त्शेरिंग हे सुद्धा त्यांच्याबरोबर होते.
पूर्वेकडील सीमावर्ती भागात त्यांनी नुकताच पाच दिवसांचा ट्रेक केला. त्यावेळी त्यांना काही ठिकाणी खडकाळ भागातून जावे लागले, तर काही ठिकाणी घनदाट जंगलातून मार्गक्रमण करावे लागले. राजे वांगचूक यांना दोन मुले आहेत. यातील एक पाच वर्षांचा आहे, तर दुसरा अलीकडेच जन्मला आहे.
देशाचा कारभार पाहताना राजांना बाहेर जावे लागते, अधिकाऱ्यांसह बैठका घ्यावा लागतात तसेच नागरिकांना भेटावे लागते. त्यामुळे गेली अनेक महिने त्यांना स्वतःच्या दोन चिमुकल्यांच्या सहवासास मुकावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App