विशेष प्रतिनिधी
चंडीगड : ना मी निवृत्त झालोय, ना मी थकलोय. मी जुन्याच उत्साहात हरियाणामध्ये काँग्रेसचा प्रचार करतोय, अशा शब्दांमध्ये 78 वर्षांच्या भूपेंद्र हुड्डांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या रिंग मध्ये आपली हॅट टाकली. त्यातून त्यांनी काँग्रेसमधल्या तरुण स्पर्धकांची गोची केली. या तरुण स्पर्धकांमध्ये एक नाव तर खुद्द त्यांच्या मुलाचे म्हणजे दीपेंद्र सिंह हुड्डा यांचे आहे. Bhupendra Singh Hooda statement
हरियाणा काँग्रेसचा प्रचार जोरावर आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला 10 पैकी 5 जागांवर यशस्वीरित्या रोखल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. हरियाणात काँग्रेसला सत्तेवर आणायची जिद्द काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बाळगत प्रचारात तुफान उभे केले आहे. Bhupendra Singh Hooda
Hindu go back : ‘हिंदूंनो परत जा…’, कॅलिफोर्नियातील BAPS मंदिरात द्वेषपूर्ण संदेश लिहून तोडफोड
पण त्याच वेळी सत्तेची चाहूल लागताच हरियाणा काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी उफाळून भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यासारख्या 78 वर्षांच्या नेत्याने वजाबाकीचे राजकारण करत दलित नेत्या कुमारी शैलजा यांना प्रचारापासूनच बाजूला ठेवून दिले आहे.
त्या पाठोपाठ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत स्वतःचेच नाव अग्रभागी ठेवत हरियाणातील तरुण काँग्रेस नेत्यांची गोची केली आहे. हरियाणा मध्ये कुमारी शैलजा, रणदीप सुरजेवाला, दिपेंद्र सिंह हुड्डा यांची नावे तरुण नेते म्हणून मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत परंतु त्या चर्चांना भूपेंद्रसिंग होंडा यांनीच काटशह देऊन परस्पर त्यांचे नावे कापून टाकली आहेत. Bhupendra Singh Hooda
पण हरियाणातल्या या वृद्ध विरुद्ध तरुण या लढतीमध्ये राजस्थान सारखीच काँग्रेसची अवस्था होण्याची दाट शक्यता असल्याचे राजकीय निरीक्षकांनी मत व्यक्त केले आहे. Bhupendra Singh Hooda
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App