वृत्तसंस्था
रामगड : जम्मू-काश्मीर ( Jammu and Kashmir ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामगडमध्ये निवडणूक रॅली काढण्यासाठी पोहोचले होते. येथे ते म्हणाले, “येथे शांततापूर्ण निवडणुकांद्वारे भाजप सत्तेत परतल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरही जम्मू-काश्मीरचा भाग होणार आहे. यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे, ते आपली लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. ते लढत आहेत. त्यांची लोकशाही वाचवणे कठीण आहे.”
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान आपल्या लोकशाहीचे रक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. पाकिस्तानमध्ये आता पीठ 500 रुपये किलो आहे, तर पंतप्रधान मोदी 80 कोटी भारतीयांना मोफत रेशन आणि पाच लाख रुपयांपर्यंतची मोफत आरोग्यसेवा देत आहेत. पाकिस्तान बुडत आहे, पण भारत पुढे जात आहे. पाकिस्तान हे बुडणारे जहाज आहे.
‘भिकारी पाकिस्तान…’
सीएम योगी म्हणाले की, एका बाजूला भारत आहे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे, तिथे अन्नाचा तुटवडा आहे, हे स्वाभाविक आहे, भिकारी पाकिस्तान आज स्वत:ला सांभाळू शकत नाही. आम्हालाही जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत सहभागी होण्याचा अधिकार असल्याचे सांगत पाकव्याप्त काश्मीर त्यातून वेगळे होण्यासाठी आवाज उठवत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला चांगला संदेश द्यायचा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App