काँग्रेसला आणखी एक धक्का देण्याची शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी, बारा आमदारांच्या निलंबनाची बक्षीसी म्हणून भास्कर जाधव यांना पडू लागले विधानसभा अध्यक्षपदाचे स्वप्न


विशेष प्रतिनिधी

गुहागर: भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांचे निलंबन घडविण्यात महत्वाची भूमिका बजावल्याची बक्षीसी म्हणून आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्षपदाचे स्वप्न पडू लागले आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमताने विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल तरच शिवसेनेने स्वीकारावे असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. Bhaskar Jadhav’s dream of becoming the Speaker of the Assembly began as a reward for the suspension of twelve MLAs

भास्कर जाधव म्हणाले, तीनही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी व्हायला तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र त्या बदल्यात शिवसेनेने आपल्याकडचे वन मंत्रिपद सोडू नये. भास्कर जाधव गुहागरमध्ये बोलत होते. शिवसेनेकडे आधीच कोणतीही महत्त्वाची खाती नाहीत आणि त्यात आहे हे मंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे मत जाधव यांनी व्यक्त केले.जाधव म्हणाले, कोणाला काय द्यावं, कोणाला कुठे बसवावं हे तिन्ही पक्षांनी मिळून ठरवायचं असतं. भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले तर चांगल्या प्रकारे काम करतील, असं मत तिन्ही पक्षांचं मत झालंय. शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मतावर मी ठाम आहे.

शिवसेनेकडे वनखातं तसंच ठेवून जर अध्यक्षपद मिळत असेल तर घ्यावं. एक तर शिवसेनेकडे महत्त्वाची खातीच नाहीत. त्यामुळे शिवसेनेनं मंत्रिपद सोडून अध्यक्षपद घ्यावं असं मला वाटत नाही

पावसाळी अधिवेशातील पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार संघर्ष झाला. अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला होता. त्यामुळे भाजपाचे बारा आमदार एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते.

Bhaskar Jadhav’s dream of becoming the Speaker of the Assembly began as a reward for the suspension of twelve MLAs

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात