दारू दुकानदारांकडून विजय वडेट्टीवारांच्या आरत्या ओवाळणे सुरू, चंद्रपुरातील बारमालकाने केली त्यांच्या फोटोची पूजा


विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : हजारो महिलांच्या आंदोलनानंतर चंद्रपूर जिल्ह्यात झालेली दारूबंदी पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूवाल्यांच्या प्रेमापोटी उठविली. त्यामुळे या दारूवाल्यांकडून त्यांच्या आरत्या ओवाळणे सुरू झाले आहे. चंद्रपुरातील एका बारमालकाने तर चक्क वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा केली.Liquor shopkeepers start chanting Vijay Vadettiwar , bar owner in Chandrapur worships his photo

चंद्रपुरात त्यांच्यामुळे खुशयाली आल्याचेही या बारमालकाने म्हटले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात 6 वर्षांनी दारुविक्रीवरील बंदी हटली आहे. त्यामुळे बारमालक आणि मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा हा आनंद आता एका व्हिडीओतून समोर आला आहे. 

याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक बारमालक चक्क चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करताना दिसत आहे.
राज्य सरकारने चंद्रपुरात दारुबंदी उठवल्यामुळे मद्यप्रेमींच्या आनंदाला उधाण आलं आहे.

या आनंदात एक बारमालक तर थेट पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करत आहे. त्याने आपल्या बारमध्ये विजय वडेट्टीवार यांचा फोटो लावला आहे. त्या फोटोची बारमालक आरती करत असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ हा चंद्रपूर शहरातील ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमधाला असल्याचं उघड झालं आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करणारे बारमालक गणेश गोरडवार म्हणाले, विजय वडेट्टीवार हे आमच्यासाठी देव आहेत. शहरात पुन्हा आनंद आला आहे. विजय भाऊंनी खूप चांगलं काम केलं आहे. आम्हाला त्यांच्या कामाबद्दल इतका आनंद झाला की आम्ही थेट त्यांच्या फोटोची आरती केली.

कारण ते आजच्या परिस्थितीत आमच्यासाठी देवच ठरले आहेत. जो आमचं पोट भरतो तोच आमचा देव. जे मद्यविक्रेते आहेत त्यांच्या सगळ्यांची एकच भावना होती. आम्ही सगळे विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार होतो. त्यांची खूप मेहरबानी आहे.

त्यांच्यामुळे चंद्रपुरात खुशी परत आली. चंद्रपुरात पुन्हा एकदा 750 बार-रेस्टॉरंट सुरु झाले आहेत. दारुबंदी उठल्यानंतर पहिल्या 3 दिवसात मद्यप्रेमींनी 1 कोटींची दारु रिचवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Liquor shopkeepers start chanting Vijay Vadettiwar , bar owner in Chandrapur worships his photo

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात