विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने पश्चिtम बंगालमधील तीन व ओडिशातील एका विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर केली. यामुळे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे भवानीपूरमधून या परंपरागत मतदारसंघातून विधानसभेत जाण्याचा त्यांचा मार्ग खुला झाला आहे. पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबरला मतदान होणार असून ३ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. Bhanainagar by lection will be on 30 sept.
बॅनर्जी या ५ नोव्हेंबरपर्यंत विधानसभा सदस्य झाल्या नाहीत तर त्यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला व्हांवे लागणार आहे. म्हणूनच पोटनिवडणूक जाहीर होण्यासाठी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून आटोकाट प्रयत्न सुरु होते. राज्यातील पोटनिवडणुकीला भाजपचा मात्र विरोध होता.
प्रशासकीय गरज, सार्वजनिक हित आणि राज्यातील पोकळी भरुन काढण्यासाठी निवडणूक घेण्याची विशेष विनंती मुख्य सचिवांनी केल्याने भवानीपूरमध्ये पोटनिवडणूक जाहीर केली आहे, असे निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्याच वेळी देशभरातील ३१ विधानसभा व तीन लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणूक कोरोनामुळे टाळली आहे, असेही सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App