जाणून घ्या, मैदानात मॅच शिवाय आणखी काय-काय घडणार?
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाचा सामना भव्यदिव्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. BCCI will leave no point unturned to make the World Cup final grand
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आणि टीव्हीवर सामना पाहणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांना असे काही दाखवण्यासाठी तयार आहे, जे ICC इव्हेंटमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेले दृश्य असेल.
एकापाठोपाठ एक होणार्या नेत्रदीपक कार्यक्रमांची माहिती देताना बीसीसीआयने सांगितले की, अंतिम सामन्याच्या दरम्यान प्रेक्षकांना एअर शो, लाईट अँड साउंड शो, ड्रोन शो, म्युझिकल परफॉर्मन्स, फटाके पाहायला मिळतील. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीमकडून एअर सॅल्युट, प्रीतमचे लाइव्ह म्युझिकल परफॉर्मन्स, विश्वचषक विजेत्या सर्व कर्णधारांची परेड ऑफ चॅम्पियन्स, लेझर शो आणि जागतिक विजेत्याच्यास विश्वचषक प्रदान करतेवेळी एरियल ‘चॅम्पियन्स’ असणार आहे. बोर्ड प्रेक्षकांना या सर्व गोष्टींनी एक वेगळा अनुभव देणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App