‘या’ स्टार खेळाडूला आले वगळण्यात
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताला बांगलादेशविरुद्ध ( Bangladesh ) २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे. वेगवान गोलंदाज यश दयालला प्रथमच भारतीय संघात संधी मिळाली आहे. तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आलेली नाही. पहिल्या कसोटीसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारत 19 सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी बीसीसीआयने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीही संघात पुनरागमन करत आहे. टीम इंडियात दोन यष्टिरक्षकांना संधी मिळाली आहे. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांचा यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. तर केएल राहुलचा फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. सर्फराज खानलाही संधी मिळाली आहे. तर श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालेले नाही.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या संघात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर होणार असून तेथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. यासाठी चार फिरकीपटूंना संघात ठेवण्यात आले आहे. गोलंदाजीशिवाय अश्विन आणि जडेजा ही जोडी उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखली जाते.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल. .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App