सरकारी बँकांच्या शाखेत जाऊन कोणतेही काम करून घ्यायचे असेल, तर तुमचे काम होणार नाही, अशी शक्यता आहे. आज 16 डिसेंबर आणि उद्या 17 डिसेंबरला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये संप असणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन (UFBU) ने दोन दिवसांचा संप जाहीर केला होता, तो थांबवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, त्यामुळे 4000 हून अधिक सार्वजनिक क्षेत्रातील शाखांमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. Bank Strike Bank employees strike today and tomorrow Know Important Details
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सरकारी बँकांच्या शाखेत जाऊन कोणतेही काम करून घ्यायचे असेल, तर तुमचे काम होणार नाही, अशी शक्यता आहे. आज 16 डिसेंबर आणि उद्या 17 डिसेंबरला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये संप असणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन (UFBU) ने दोन दिवसांचा संप जाहीर केला होता, तो थांबवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, त्यामुळे 4000 हून अधिक सार्वजनिक क्षेत्रातील शाखांमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.
सरकारी बँकांच्या ग्राहकांना आता आर्थिक किंवा बिगर आर्थिक व्यवहार किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या बँकिंग कामासाठी शनिवारची वाट पाहावी लागणार आहे कारण दोन दिवसांच्या संपामुळे बँक आता शनिवार, 18 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे राज्य निमंत्रक महेश मिश्रा यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, केंद्र सरकार संसदेच्या चालू अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणत आहे, ज्यामुळे कोणत्याही सरकारी बँकांना खासगीत देण्याचा मार्ग मोकळा होईल. भविष्यात सरकारच्या या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी आणि अधिकारी 16 आणि 17 डिसेंबरला दोन दिवसीय देशव्यापी संपावर जाणार आहेत.
खासगीकरणाविरोधातील बँकांच्या या संपात बँकांचे खासगीकरण झाल्यास त्याचा फटका या बँकांमध्ये खाती ठेवणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना बसेल, हा मुद्दा विशेषत्वाने ठेवण्यात आला असल्याचे एका सरकारी बँकेच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे. पाहिल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम खालच्या वर्गातून आलेल्या खातेदारांवर होईल. शून्य शिल्लक असलेली खाती उघडण्यासाठी सरकारी बँकांमध्ये ज्या पद्धतीने मदत केली जाते ती खासगी बँकांमध्ये कोणत्याही प्रकारे दिसत नाही. याशिवाय सरकारी बँकांवर कामाचा बोजा अधिक असून वर्षानुवर्षे सरकारी बँकांमध्ये काम करणारे अधिकारी आणि बँकर्स यांना अचानक खासगी बँक कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App