Bangladeshi : हिंदू, बौद्धांसह बांगलादेशी अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेची हमी द्या; बांगलादेशी हंगामी सरकार आणि मोदी सरकारला संघाने सुनावले

Modi government

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बांगलादेशातील ( Bangladesh) हिंसक आंदोलनात शेख हसीनांचे सरकार गेले. नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांचे सरकार आले. पण या सगळ्या हिंसक घडामोडींचे बळी बांगलादेशी हिंदू ठरले. जमाते इस्लामीच्या गुंडांनी हिंसक विद्यार्थी आंदोलनाचा फायदा उपटून हजारो हिंदूंच्या हत्या केल्या. शेकडो मंदिरे जाळली. हजारो घरे पेटवून दिली. हजारो स्त्रियांवर बलात्कार केले.

नोबेल पारितोषिक विजेत्या पंतप्रधानाने तीन दिवसांच्या हिंसक घटनांनंतर शांततेचे आवाहन केले. प्रत्यक्ष हिंसाचार घडताना हे नोबेल पारितोषिक विजेते पॅरिसमध्ये होते. बांगलादेशाच्या हंगामी सरकारची सूत्रे स्वीकारण्यासाठी ते ढाक्यात आले. पॅरिसहून ढाक्याकडे निघताना त्यांनी हिंसाचार थांबविण्याचे आवाहन केले.

मोदी सरकारने सरकारी पातळीवर या प्रकरणांची दखल घेऊन बांगलादेशातल्या हंगामी सरकारला हिंदूंच्या सुरक्षेच्या सूचना केल्या. परंतु काँग्रेस सकट कुठल्याही विरोधकांनी बांगलादेशातल्या हिंदूंच्या सुरक्षेविषयी साधी चिंताही व्यक्त केली नाही, मग बांगलादेशी सरकारला त्यांनी काही सुनावणे तर दूरच राहिले.



या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी निवेदन जारी करून बांगलादेशातल्या हंगामी सरकारकडून आणि केंद्रातल्या मोदी सरकारकडून बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेची हमी मागितली आहे.

संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी याची माहिती दिली. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी बांगलादेशात सध्या घडत असलेल्या घटनांबद्दल एक निवेदन जारी केले आहे.

या वक्तव्यात होसबळे म्हणतात :

बांगलादेशी हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांवर संघ गंभीर चिंता व्यक्त करतो. गेल्या काही दिवसांपासून तेथील बौद्ध आणि इतर अल्पसंख्याक समाजाच्या सत्ता परिवर्तनाच्या आंदोलनादरम्यान हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजाच्या महिलांविरुद्धचे जघन्य गुन्हे आणि मंदिरांवर हल्ले झाले. संघ या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो.

संघ या हिंसेचा तीव्र निषेध करतो. जागतिक समुदाय आणि भारतातील राजकीय पक्षांना छळाचा बळी ठरलेल्या हिंदू, बौद्ध आणि इतर समुदायांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भारत सरकारला आवाहनही केले आहे की RSS बांगलादेशचा एक मित्र शेजारी देश म्हणून योग्य भूमिका घेण्याचा प्रयत्न करतो आणि हिंदू, बौद्ध आणि इतरांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.

Bangladeshi minorities including Hindus, Buddhists; The team heard the Bangladesh interim government and the Modi government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात