वृत्तसंस्था
ढाका : बांगलादेशच्या विद्यार्थी आंदोलनानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर ८ ऑगस्ट रोजी अंतरिम सरकारची स्थापना झाली होती. बांगलादेशमधील नव्या युनूस सरकारला रविवारी एक महिना झाला. अंतरिम सरकारने एक महिन्यात देशातील उच्च संस्थांत बदल केले. हसीना यांच्या काळातील उच्च अधिकाऱ्यांना हटवले. कट्टरवादी समर्थक जमात-ए-इस्लामी पार्टीने रवींद्रनाथ टागोर लिखित ‘अमार सोनार बांगला’ या राष्ट्रगीतास बदलण्याची मागणी केली. आता ती आणखी वाढू लागली आहे. Demands to change national anthem written by Rabindranath Tagore grow in Bangladesh
धार्मिकविषयक प्रकरणांचे मंत्री खालिद हुसैन यांनी राष्ट्रगीत बदलण्याची मागणी फेटाळली आहे. परंतु अंतरिम सरकारने राज्यघटना बदलण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. लष्कर समर्थित अंतरिम सरकार आगामी दिवसांत स्वातंत्र्य लढ्याच्या प्रतिकांना संपवून टाकेल. आंदोलनात वंगबंधू मुजीबऊर रहेमान यांचा पुतळा पाडला गेला.
ढाक्यासह बांगलादेशच्या अनेक शहरांत पसरलेल्या गारमेंट इंडस्ट्रीतील बहुतांश युनिट पुन्हा सक्रिय झाले. विद्यमान सरकार वस्त्रोद्योग कार्यान्वित करण्यात यशस्वी ठरले आहे. येथे ८५ टक्के महिला काम करतात. बांगलादेशच्या एकूण निर्यातीत गारमेंट उद्योगाचा वाटा ८० टक्के आहे. दंगलीच्या काळाही गारमेंट फॅक्टरीला आग लागली नाही. आता उद्योग चांगलेच रुळावर आहेत.
Kargil War : कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानची मोठी कबुली; लष्करप्रमुखांच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
अमेरिकेच्या बाजूने नवीन सरकारचा कल वाढणार
अंतरिम सरकारने ढाक्याचे मोठ्या देशांसोबतच्या संबंधांत संतुलन राखण्याच्या गरजेवर भर दिला. परराष्ट्रमंत्र्यांचे सल्लागार मोहंमद तौहीद हुसेन म्हणाले, अंतरिम सरकारचे पहिले प्राधान्य कायदा-सुव्यवस्थेला असेल. परराष्ट्र धोरणावर सरकारने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. चीनसोबत जागतिक शक्ती रूपात संपर्क ठेवावा. भारत प्राधान्यक्रमाच्या यादीत असेल.
मंत्रालयापासून विद्यापीठापर्यंत कट्टरवाद्यांची वर्णी
४ सप्टेंबरला जमात-ए-इस्लामचे माजी प्रमुख गुलाम आझमचा मुलगा अब्दुल्ला अमन आझमीने ‘आईनाघर’ मध्ये ८ वर्षांच्या कैदेतील अनुभव मांडले आहेत. बांगलादेशचे राष्ट्रगान, राष्ट्रध्वज, राज्यघटना बदलण्यासाठी वादग्रस्त टिप्पणी केली होती. कट्टरवादी जमातच्या या मोहिमेला बांगलादेशमध्ये विरोध होत आहे. कलाकारांचा गट ‘उदिची’च्या शेकडो कलाकारांनी बांगलादेशचे राष्ट्रगान बदलण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून राष्ट्रगान म्हटले. राष्ट्रध्वज फडकावला आणि कटास विरोध केला.
विविध मंत्रालयांतील ३० सचिवांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक देशांतील राजदूतांना माघारी बोलावण्यात आले आहे किंवा काहींची सेवा समाप्त केली आहे. सुमारे ५० हून जास्त विद्यापीठांचे कुलगुरू, रजिस्ट्रार १४७ शाळा व महाविद्यालयात प्राचार्यांच्या जागी नवीन नियुक्ती केली आहे. बीएनपीचे सरचिटणी मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर म्हणाले, आतापर्यंत हे सरकार चांगले काम करत आहे. सर्वात मोठा पक्ष या नात्याने आम्ही लोकशाही पूर्ववत व्हावी म्हणून प्रयत्न करू.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App