
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांता क्लॉजच्या पुतळ्यावर पेट्रोल टाकून पुतळाही जाळला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.Bajrang Dal burns statue of Santa Claus; Murdabad’s announcement
विशेष प्रतिनिधी
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राष्ट्रीय बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेने सांता क्लॉज मुर्दाबादच्या घोषणा दिल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांता क्लॉजच्या पुतळ्यावर पेट्रोल टाकून पुतळाही जाळला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये देखील अशा घटना घडल्याचं समोर आलं आहे.
बजरंग दलाने ख्रिसमस सणाला विरोध केला आहे.बजरंग दलाने म्हटले आहे की , सांता क्लॉज किंवा ख्रिसमसच्या नावावर लोकांची दिशाभूल केली जात आहे.तसेच धर्मातरणासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप बजरंग दलाने केला आहे.तसेच हिंदूंनी यापासून सावध राहावं , या देशात केवळ हिंदूत्व चालेल असंही म्हटलंय.
In UP's Agra, members of "Rashtriya Bajrang Dal" raised slogans of "Santa Claus Murdabad" and later burnt effigy to mark their protest. pic.twitter.com/UgHsfnOy4l
— Piyush Rai (@Benarasiyaa) December 25, 2021
दरम्यान, कर्नाटकमध्ये मांडया जिल्ह्यात एका शाळेत सुरू असलेल्या ख्रिसमसचा कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला. हे कार्यकर्ते निर्मला इंग्लिश स्कुल अँड कॉलेजमध्ये शिरले आणि त्यांनी विरोध केला. तसेच शाळा हिंदू सण साजरे करत नाहीत, असा आरोपही केला.
Bajrang Dal burns statue of Santa Claus; Murdabad’s announcement
महत्त्वाच्या बातम्या
- ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, नितेश राणे यांनी उडवली नबाब मलिकांची खिल्ली
- आरोग्य कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही घेता येणार बूस्टर डोस
- पैशासाठी अभिनेत्रीकडून बलात्काराचा आरोप असलेल्या आमदारावर कौतुकाचा वर्षाव
- अनिल परब यांची बेकायदेशिर रिसॉर्ट तोडण्यासााठी लवकरच आदेश, मंत्रीपद काढून घेण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करणार, किरीट सोमय्या यांची मागणी
Array