१८ ऑक्टोबर २०२० पासून बुलेटचा सायलेन्सर बदलणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली. जानेवारी २०२१ पर्यंत अडीच हजारांहून अधिक जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. Pune: Action on 203 bullet riders in two days; Remove the loud silencer taken
विशेष प्रतिनिधी
पिंपरी : बुधवारपासून वाहतूक पोलिसांनी बुलेटला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवल्यामुळे बुलेटस्वारांवर पुन्हा कारवाईला सुरुवात केली. दोन दिवसांत 203 बुलेटस्वारांना दंड करून त्यांचे मोठ्या आवाजाचे सायलेन्सरही काढून घेतले.एवढेच नव्हे तर जवळचा मॅकॅनिक बोलवून मोठ्या आवाजाचा सायलेन्सरही काढून घेतला. आरटीओच्या नियमानुसार वाहनांमध्ये सर्वसामान्यांना कोणताही बदल करता येत नाही.
तरीदेखील काही बुलेटस्वार बुलेटचा मूळ सायलेन्सर काढून त्याजागी मोठ्या आवाजाचा सायलेन्सर बसवतात. तर काहीजण मोठ्या फटाक्यासारखा मध्येच आवाज येईल, सायलेन्सर बसवतात. अचानक वाजलेल्या अशा आवाजामुळे शेजारील वाहन चालक बिचकतात.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. तसेच प्रदुषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होते. १८ ऑक्टोबर २०२० पासून बुलेटचा सायलेन्सर बदलणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली.
जानेवारी २०२१ पर्यंत अडीच हजारांहून अधिक जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे बुलेटचा सायलेन्सर बदलणाऱ्यांना चांगलाच चाप बसला होता. मात्र त्यानंतर कारवाईमध्ये शिथिलता आल्यानंतर काही बुलेटस्वारांनी पुन्हा मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविले.अशा बुलेटस्वारांवर वाहतूक पोलिसांनी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला. गेल्या दोन दिवसांमध्ये २०३ बुलेटस्वारांवर कारवाई केली.
Pune: Action on 203 bullet riders in two days; Remove the loud silencer taken
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App