आझम खानवर यांना आणखी एक दणका ; रामपूरमधील दारूल अवाम कार्यालय सील!

  • समाजवादी पार्टीचे सरचिटणीस मोहम्मद आझम खान हे सीतापूर तुरुंगात शिक्षा भोगत आहेत

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री आझम खान यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आझम खान यांचे रामपूर येथील दारूल अवामचे कार्यालय सील करण्यात आले आहे. यासोबतच रामपूरच्या समाजवादी पक्षाच्या कार्यालयालाही टाळे ठोकण्यात आले आहे.Azam Khanwars Darul Awam office in Rampur sealed

सपा नेत्यांना कार्यालयातून बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत रामपूरचे एएसपी म्हणाले की, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी हे कुलूप लावले आहे. रामपूर पब्लिक स्कूल आणि दारूल अवाम शाळेला टाळे ठोकण्यात आले आहे. समाजवादी पार्टीचे सरचिटणीस मोहम्मद आझम खान हे सीतापूर तुरुंगात शिक्षा भोगत आहेत, त्यांचे रामपूरमधील दारूल अवामचे कार्यालय होते तेथूनच रामपूरमध्ये समाजवादी पक्षाचे सर्व काम होत होती आणि आझम खानही येथेच बसायचे.



आज शुक्रवारी (10 नोव्हेंबर) रामपूर पोलीस आणि प्रशासनाने दारूल अवामचे कार्यालय सील केले असून समाजवादी पक्षाच्या सर्व नेत्यांना कार्यालयाबाहेर हाकलले आहे. यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यूपी सरकारने कॅबिनेटच्या निर्णयाने मोहम्मद अली जौहर ट्रस्टची लीज रद्द केली होती.

समाजवादी पक्षाच्या राजवटीत आझम खान यांना माध्यमिक शिक्षण विभागाकडून 100 रुपये प्रतिवर्ष या दराने 41 हजार चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर मिळाली होती. मोहम्मद अली जौहर ट्रस्टला आझम खानच्या जौहर विद्यापीठाच्या उभारणीसाठी कार्यालयाची आवश्यकता होती, हा त्याचा उद्देश होता. ते कार्यालय उघडण्यासाठी आझम खान यांनी ते समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात भाडेतत्त्वावर घेतले होते. त्यासाठी वर्षाला 100 रुपये दराने दोन पट्टे लिहून घेण्यात आले. ज्यामध्ये एक सुमारे 16 हजार स्क्वेअर फूट आणि दुसरा 25 हजार स्क्वेअर फूट जमिनीचा भाडेपट्टा होता, दोन्ही जमिनी एकमेकांशी मिळलेल्या आहेत. ज्यामध्ये रामपूर पब्लिक स्कूल आणि समाजवादी पार्टीचे कार्यालय कार्यरत होते.

आता उत्तर प्रदेश सरकारने आझम खान यांच्या मोहम्मद अली जौहर ट्रस्टच्या दोन्ही लीज अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून रद्द केल्या होत्या. त्यानंतर आज पोलीस आणि प्रशासनाच्या उपस्थितीत आझम खान यांच्या ताब्यातून मालमत्ता सोडवून माध्यमिक शिक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या. दोन्ही मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

Azam Khanwars Darul Awam office in Rampur sealed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात