विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या तुरुंगात असलेले समाजवादी पाटीर्चे नेते आझम खान यांनी अंतरिम जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. निवडणुकीत प्रचार करता यावा याासाठी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.Azam Khan wants bail for election campaign, approched Supreme Court
आझम खान सध्या उत्तर प्रदेशातील सितापूर कारागृहात आहेत.गेल्या दोन वर्षांपासून आझम खान हे सीतापूर कारागृहात आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांचा मुलगा अब्दुल्ला हे काही दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत.
त्याचबरोबर त्यांच्या पत्नीलाही जामीन मिळाला आहे. आझम खान यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलावर अनेक गुन्हे दाखल आहेत.खान म्हणाले की, राज्य विधानसभा निवडणुकीदरम्यान आपण तुरुंगात राहो यासाठी तीन उर्वरित जामीन अर्जावरील कार्यवाही हेतुपुरस्सर लांबणीवर टाकण्यासाठी राज्याने उपलब्ध सर्व मार्गांचा अवलंब केला आहे.
त्यांच्याविरुध्द प्रलंबित असलेल्या इतर सर्व खटल्यांमध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे, परंतु तीन प्रकरणांमधील कार्यवाहीस मुद्दामहून उशिर करण्यात आला आहे. आझम खान हे फेब्रुवारी 2020 पासून अनेक गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App