आझम खान यांना योगी सरकारचा दणका; २० हजारांचे आणीबाणी विरोधी सैनिक पेन्शन केले बंद

  • २००५ पासून मिळत होता पेन्शनचा लाभ

वृत्तसंस्था

लखनौ : समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूरचे वादग्रस्त खासदार आझम खान यांना योगी सरकारने मोठा दणका दिला आहे. सरकारने आझम खान यांना लोकतंत्र सेनानी म्हणून मिळणारे पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पेन्शन म्हणून आझम खान यांना दर महिन्याला २० हजार रुपये देण्यात येत होते.  Yogi govt terminated Azam Khan Pension of loktantra senani

इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या कालावधीमध्ये तुरुंगवास झालेल्या नेत्यांना ‘लोकतंत्र सेनेनी’ असा दर्जा देऊन त्यांना मासिक पेन्शन दिले जात होते. मात्र योगी सरकारच्या नव्या निर्णयामुळे आझम खान यांना यापुढे हा पेन्शनचा निधी मिळणार नाही.सन २००५ साली तत्कालीन मुलायम सरकारने आझम खान यांना लोकतंत्र सेनेनी म्हणून घोषित करत पेन्शन सुरु केले होते. सुरुवातीला या पेन्शनची रक्कम ५०० रुपये इतकी होती. नंतर ही रक्कम थेट प्रति महिना २० हजार रुपये इतकी करण्यात आली. अनेक प्रकरणांमध्ये आझम खान यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने योगी सरकारने अपराधी पार्श्वभूमीचे कारण देत हे पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ‘आज तक’ने ही बातमी दिली आहे.

आणीबाणीची घोषणा करण्यात आली त्यावेळी आझम खान हे अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी संघटनेचे नेते होते. आणीबाणीच्या काळात आझम खान यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. जेव्हापासून आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन सुरु करण्यात आले आहे तेव्हापासून आझम खान याचा लाभ घेत होते. बुधवारी रामपूर जिल्हा प्रशासनाने लोकतंत्र सेनानींची यादी जाहीर केली तेव्हा त्यामध्ये ३५ जणांच्या नावांचा समावेश होता. यापूर्वी ही यादी ३७ जणांची होती. आझम खान यांना या नव्या यादीतून वगळण्यात आले आहे.

रामपूरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आंजनेय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार आझम खान यांच्याविरोधात दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची संख्या आणि गांभीर्य लक्षात घेता त्यांचे पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी यासंदर्भातील माहिती आणि अहवाल राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाकडून मागवला होता.

Yogi govt terminated Azam Khan Pension of loktantra senani

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*