Ram Mandir Land Deal : रजिस्ट्रीचे साक्षीदार अयोध्येचे महापौर म्हणाले- परस्पर सहमतीने झाली खरेदी, कोणताही घोटाळा नाही!

Ayodhya mayor rishikesh upadhyaya says no Scam in ram mandir land deal

Ram Mandir land Deal : अयोध्येत राम मंदिराच्या जागेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महापौर ऋषिकेश उपाध्याय यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वादग्रस्त भूमीच्या दोन्ही नोंदणीदरम्यान साक्षीदार असलेले महापौर म्हणाले की, भव्य राम मंदिर बांधण्यासाठी व वास्तूतील दोष दूर करण्यासाठी ही जमीन खरेदी केली गेली आहे. यामध्ये थोडीशीही गडबड झालेली नाही. Ayodhya Mayor Rishikesh Upadhyaya Says No Scam In Ram Mandir Land Deal


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : अयोध्येत राम मंदिराच्या जागेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महापौर ऋषिकेश उपाध्याय यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वादग्रस्त भूमीच्या दोन्ही नोंदणीदरम्यान साक्षीदार असलेले महापौर म्हणाले की, भव्य राम मंदिर बांधण्यासाठी व वास्तूतील दोष दूर करण्यासाठी ही जमीन खरेदी केली गेली आहे. यामध्ये थोडीशीही गडबड झालेली नाही.

राम मंदिर ट्रस्टने ही जमीन बाजार भावाने विकत घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौरांनी हेदेखील स्पष्ट केले की, ही जमीन विकणार्‍या लोकांनी अनेक वर्षांपूर्वी करार केला होता. ज्याचे मध्ये-मध्ये नूतनीकरण होत राहिले. महापौर म्हणाले की, काही अडचणींमुळे ते जमीन खरेदी करू शकले नाही. जेव्हा समस्यांचे निराकरण झाले, तेव्हा ट्रस्ट आणि विक्रेते यांच्यात करार झाला आणि जमीन खरेदी केली गेली. यासंदर्भात राम मंदिर ट्रस्ट पत्रकार परिषद घेणार असून आपला म्हणणे मांडणार आहे, असे महापौरांनी सांगितले.

जमिनीची किंमत वाढली

दुसरीकडे, डॉ. रामविलास वेदांती म्हणतात की, हे सर्व राजकीय आणि आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. प्रत्येक पैशाचे ट्रस्टमध्ये ऑडिट केले जाते, जेव्हा जमीन मालकाने करार केला होता, तेव्हा त्याची किंमत वेगळी होती आणि ट्रस्टला विकेपर्यंत किंमत वाढली होती. चंपत राय हे एक प्रामाणिक व्यक्ती आहेत, हे सर्व रामभक्तांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, कारण पूर्वीही राजकीय पक्ष हे करत आले आहेत.

जागा खरेदीत कोणतीही गडबड झाली नाही – महापौर

महापौरांपूर्वी सचिव चंपत राय म्हणाले होते की, मंदिरातील जमीन खरेदीच्या घोटाळ्याचे आरोप राजकीय द्वेषामुळे प्रेरित आहेत. ते म्हणाले की, आतापर्यंत खरेदी केलेली सर्व जमीन बाजारपेठेपेक्षा कमी किंमतीत विकत घेण्यात आली आहे. चंपत राय यांनी असेही म्हटले होते की, खरेदी-विक्रीचे काम परस्पर संवाद आणि संमतीच्या आधारे केले जात आहे. त्यासाठी मुद्रांक कागदपत्रांची खरेदी ऑनलाइन केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार संपूर्ण किंमत विक्रेत्याच्या खात्यात ऑनलाइन हस्तांतरित केली जात आहे.

सपा नेत्याचा भ्रष्टाचाराचा आरोप

जमीन खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप सपा नेत्यांनी केला आहे. ते म्हणतात की, ज्या भूमीचा बेनामा 2 कोटी रुपये झाला होता, ती जमीन 10 मिनिटांत 18.50 कोटी रुपयांची झाली. अनेक कागदपत्रे सादर करत त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Ayodhya mayor rishikesh upadhyaya says no Scam in ram mandir land deal

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात