वृत्तसंस्था
अंकारा : Turkey kills तुर्कीची राजधानी अंकारा येथे बुधवारी एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी TUSAS वर हल्ला झाला. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमीही झाले आहेत.Turkey kills
तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. या हल्ल्यामागे कोणाचा हात होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर टॅक्सीत आले होते. येथे पोहोचल्यानंतर त्यांनी बॉम्बचा स्फोट केला आणि गोळीबार सुरू केला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टॅक्सीत एकूण 3 लोक होते. त्यांच्यामध्ये एक महिलाही होती. त्यापैकी एक आत्मघाती हल्लेखोर होता, ज्याने स्वत:ला बॉम्बने उडवले. उर्वरित 2 जणांनी लोकांवर गोळीबार सुरू केला.
सध्या सुरक्षा दल, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. स्थानिक मीडियानुसार, या कंपनीत सुमारे 15 हजार लोक काम करतात.
स्थानिक मीडियाने हल्लेखोरांशी संबंधित सीसीटीव्ही छायाचित्रेही शेअर केली आहेत…
तुर्कीमध्ये यापूर्वीही असे हल्ले झाले आहेत. त्यांच्या मागे कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (पीकेके) या अतिरेकी संघटनेचे नाव पुढे आले आहे. या हल्ल्यामागे त्यांचा हात असल्याचा संशयही स्थानिक माध्यमांतून व्यक्त केला जात आहे.
पीकेकेची स्थापना 1978 मध्ये अब्दुल्ला ओकलनने केली होती. पीकेकेने यापूर्वीही तुर्कीमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत. पीकेकेने 1984 मध्ये कुर्दांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या मागणीसाठी बंडखोरी सुरू केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App