सीमावादावर तोडग्यासाठी समित्या स्थापण्याचा आसाम, मेघालय सरकारचा निर्णय

विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी – आसाम आणि मेघालय या दोन्ही राज्यांनी परस्परांमधील सीमावाद संपुष्टात आणण्यासाठी समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमांता विश्व सरमा आणि मेघालयचे कॉनराड के संगमा यांनी ही घोषणा केली आहे. Assam Meghalaya will form committee for border dispute

या समित्यांचे नेतृत्व हे त्या त्या राज्यांतील मंत्री करतील. दोन्ही राज्यांत ज्या वादग्रस्त ठिकाणांवरून वाद आहेत त्यातील सहा जागांबाबत विविध टप्प्यांत तोडगा काढण्याचा प्रयत्न या समित्यांच्या माध्यमातून केला जाईल. प्रत्येक समितीमध्ये पाच सदस्य असतील यामध्ये एका बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यासोबतच कॅबिनेट मंत्र्याचाही समावेश असेल. याच समित्यांमध्ये स्थानिक प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल, अशी चर्चा आहे.



दोन्ही समित्यांचे सदस्य हे वादग्रस्त भागांना भेट देत तेथील स्थानिकांशी संवाद साधतील. ही चर्चा देखील ३० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे बंधन त्यांच्यावर असेल. या समित्या पाच मुद्यांचा गांभीर्याने विचार करतील त्यात ऐतिहासिक पुरावे, विविध जातींचे गट, प्रशासकीय सोय, तेथील स्थानिकांच्या भावना आणि दोन वेगवेगळ्या जागांमधील अंतर यांचा समावेश असेल असेही संगमा यांनी सांगितले.

Assam Meghalaya will form committee for border dispute

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात