जुलै 2024 पासून सर्व सरकारी कर्मचारी त्यांचे वीज बिल स्वतः भरतील. असं सरमा यांनी स्पष्ट केलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आपण अनेकदा ऐकले असेल की आपण सामान्य लोक कर भरतो आणि आपल्या कराच्या पैशांवर मंत्री लोक मौज करतात. मात्र हीच व्हीआयपी संस्कृती संपवण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मोठी कार्यवाही केली आहे. या नव्या निर्णयाच्या आधारे आता आसाममधील सर्व सरकारी क्वार्टरमध्ये राहणारे मंत्री, आमदार आणि सरकारी कर्मचारी १ जुलैपासून वीज बिल स्वतः भरणार आहेत. सोबतच व्हीआयपी कल्चर संपवण्याचा हा प्रयत्न असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.Assam Govt Ends VIP Culture Ministers MLAs will not get free electricity
बिल भरणारे ते स्वतः पहिले मंत्री असतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वास्तविक, या निर्णयामुळे राज्यातील प्रति युनिट वीज दर 1 रुपयांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया हँडलवरही त्यांनी ही माहिती दिली मी आणि मुख्य सचिव एक उदाहरण ठेवू आणि 1 जुलैपासून आमची वीज बिल भरण्यास सुरुवात करू. त्याचवेळी, जुलै 2024 पासून सर्व सरकारी कर्मचारी त्यांचे वीज बिल स्वतः भरतील. असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, राज्यातील कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी विजेचा दर 1 रुपये प्रति युनिटने कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि पुढील वर्षी आम्ही प्रति युनिट 50 पैसे अधिक कमी करू. यासोबतच विजेची बचत व्हावी यासाठी राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये रात्री आठ नंतर वीज खंडित करण्याचे स्वयंचलित यंत्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आसाममधील विशेष बाब म्हणजे राज्यातील 8000 सरकारी शाळांमध्ये हा नियम यापूर्वीच लागू करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App