वृत्तसंस्था
संभल : Sambhal Jama Masjid उत्तर प्रदेशातील संभल येथील शाही जामा मशीद प्रकरणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) शनिवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. एएसआयचे वकील विष्णू शर्मा म्हणाले, ‘येथे प्राचीन इमारती आणि पुरातत्व अवशेषांचे संरक्षण कायदा 1958 चे उल्लंघन झाले आहे. मशिदीच्या बाहेरील पायऱ्यांवर करण्यात आलेल्या बांधकामाविरोधात यापूर्वीच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.Sambhal Jama Masjid
वकील विष्णू शर्मा यांनी सांगितले की, 1998 मध्ये एएसआयने मशिदीला भेट दिली होती. त्यानंतर जून 2024 मध्ये भेट दिली. या ठिकाणी अनेक बदल करून त्याचे मूळ स्वरूप बदलण्यात आले. ज्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. काही जुनी आणि नवीन छायाचित्रेही न्यायालयाला देण्यात आली आहेत. एएसआय वेळोवेळी जामा मशिदीत तपासासाठी जात असे. मात्र तेथील स्थानिक लोकांनी एएसआयला सर्वेक्षण करू दिले नाही. संभलची शाही जामा मशीद भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते.
वास्तविक, संभलमधील जामा मशिदीच्या जागी श्री हरिहर मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता प्रशासन आणि पोलिसांचे पथक जामा मशिदीच्या पाहणीसाठी दाखल झाले होते. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी 4 जणांना गोळ्या लागल्या होत्या. तर 20 हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांनी सपा खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्यासह 2700 हून अधिक लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला असून 25 जणांना अटक करण्यात आली आहे.
संपूर्ण नियंत्रण फक्त ASI कडे असावे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे वकील म्हणाले, ‘मशीद समितीने 2018 साली मशिदीच्या पायऱ्यांवर स्टीलची रेलिंग बसवली होती. 19 जानेवारी 2018 रोजी त्याच्या विरोधात मशीद समितीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या मशिदीचे नियंत्रण एएसआयकडेच असावे.
‘एएसआयच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही मालमत्तेवर कोणीही जाऊ शकतो. तिथे फक्त विशिष्ट समाजाचे लोकच जाऊ शकतात असे नाही. कुतुबमिनार, ताजमहाल प्रमाणे…तो सर्वांसाठी खुला आहे. त्याचे संपूर्ण नियंत्रण फक्त एएसआयकडे असावे. जुन्या आणि नव्या वास्तूंची छायाचित्रेही आम्ही न्यायालयात सादर केली आहेत. पुरातन वास्तूचे स्वरूप बदलण्याचे काम करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App