विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर असे दोन दिवस इंडियाची बैठक पार पडते आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्रातल्या परिवर्तन विकास मंचाचे नेते “इंडिया” आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत सामील होणार असल्याची बातमी आहे. इंडिय आघाडीच्या या बैठकीवरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. Ashish Shelar targets Uddhav Thackerays group over India Aghadi meeting in Mumbai
आशिष शेलार म्हणतात, ”मराठीत गाजलेल्या ” अशी ही बनवाबनवी” सिनेमातील ते दृश्य… स्त्री वेशातील लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे पार्वतीच्या डोहाळे जेवणाची लगबग सुरु… “न होणाऱ्या” बाळासाठी खोटी खोटी सजावट… सत्य सगळ्याना माहिती असतानाही केवळ आपले “घर’ टिकवता यावे म्हणून धडपड… नटूनथटून बाकी मित्र नाचत आहेत… “कोणी तरी येणार येणार गं..पाहुणा घरी येणारं गं .. हे गाणं गात आहेत..! उबाठा गटाकडून मुंबईत तथाकथित इंडिया नावाच्या आघाडीच्या स्वागताची जी लगबग सुरु आहे ती पाहताना… वरिल दृश्य पटकन आठवते! काय ती होर्डिंग लावत आहेत…केवढे ते फोटो… कोण कुणाकडे पाहतोय आणि कोण कुणाला हसतोय काही कळत नाही… भाजपा सोबत होते तेव्हा भलेमोठे फोटो होर्डिंगवर झळकत होते, आता सोळा केले गोळा आणि स्वतःच स्वतःचा करून घेतला पालापाचोळा!”
मराठीत गाजलेल्या " अशी ही बनवाबनवी" सिनेमातील ते दृश्य… स्त्री वेशातील लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे पार्वतीच्या डोहाळे जेवणाची लगबग सुरु…"न होणाऱ्या" बाळासाठी खोटी खोटी सजावट… सत्य सगळ्याना माहिती असतानाही केवळ आपले "घर' टिकवता यावे म्हणून धडपड…नटूनथटून बाकी मित्र नाचत… pic.twitter.com/l57r9bsVyz — ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) August 29, 2023
मराठीत गाजलेल्या " अशी ही बनवाबनवी" सिनेमातील ते दृश्य…
स्त्री वेशातील लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे पार्वतीच्या डोहाळे जेवणाची लगबग सुरु…"न होणाऱ्या" बाळासाठी खोटी खोटी सजावट… सत्य सगळ्याना माहिती असतानाही केवळ आपले "घर' टिकवता यावे म्हणून धडपड…नटूनथटून बाकी मित्र नाचत… pic.twitter.com/l57r9bsVyz
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) August 29, 2023
मुंबईत होणाऱ्या I.N.D.I.A. च्या तिसर्या बैठकीत 26 पक्षांचे सुमारे 80 नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, मुंबईच्या बैठकीत I.N.D.I.A. अलायन्सचा लोगो जारी केला जाऊ शकतो. 23 जून रोजी पाटणा येथे I.N.D.I.A. ची पहिली बैठक झाली होती. दुसरी बैठक 17-18 जुलै रोजी बेंगळुरू येथे झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App