मुलाला मंत्रीमंडळात घेतले नाही म्हणून निषाद पार्टी प्रमुखाची भाजपाला धमकी, विधानसभा निवडणुकीत धक्का देण्याचा इशारा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळात मुलाला सहभागी करून घेतले नसल्याने उत्तर प्रदेशातील निषाद पार्टीचे प्रमुख संजय निषाद नाराज झाले असून त्यांनी भारतीय जनता पक्षाला धमकी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला धडा शिकविण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.As the son was not taken into the cabinetNishad party chief threatens BJP,

संजय निषाद यांचा मुलगा प्रविण निषाद खासदार आहे. निषाद पार्टीला केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिलेले नसल्याने प्रविण निषाद यांना मंत्रीपद मिळालेले नाही.



अपना दलाच्य अनुप्रिया पटेल यांचा मंत्रीमंडळात समावेश होऊ शकतो तर प्रविण निषाद यांचा समावेश का झाला नाही असा सवाल संजय निषााद यांनी केला आहे. ते म्हणाले, निषाद समाज भाजपापासून दूर चालला आहे. जर भाजपाने आपली चूक सुधारली नाही तर याचा परिणाम त्यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भोगावा लागेल.

उत्तर प्रदेशातील १६० विधानसभा मतदारसंघात प्रविण निषाद लोकप्रिय आहेत. अनुप्रिया पटेल केवळ काही मतदारसंघात ओळखल्या जातात असेही त्यांनी सांगितले.

आपण आपल्या भावना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. आता त्यांना निर्णय घ्यायचा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते प्रविण निषाद यांची पूर्ण काळजी घेतील, असेही संजय निषाद यांनी म्हटले आहे.

सध्याच्या उत्तर प्रदेश विधानसभेत निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल (निषाद) पक्षाचा एक आमदार आहे. संजय निषाद यांचा मुलगा प्रविण संत कबीर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.

योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रविण निषाद गोरखपूरमधून निवडून आले होते. यावेळी त्यांना महायुतीमध्ये असलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने पाठिंबा दिला होता.

As the son was not taken into the cabinetNishad party chief threatens BJP,

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात