ईडीने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली आहे. ते सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. शुगर लेव्हल सतत वर-खाली होत आहे, सध्या त्यांच्या शुगरची पातळी ४६ वर आली जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.Arvind Kejriwals health deteriorated in ED custody
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. अटकेनंतर ईडीने त्यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. न्यायालयाने केजरीवाल यांना सहा दिवसांच्या रिमांडवर ईडीकडे पाठवले आहे.
केजरीवाल यांची तब्येत बिघडण्याआधी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी मंगळवारी संध्याकाळी तुरुंगात आपल्या पतीला भेटायला गेल्याचा व्हिडिओ जारी केला. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांना मधुमेह आहे, साखरेची पातळी वर-खाली होत आहे. त्यांना खोट्या खटल्यात तुरुंगात टाकले आहे, पण त्यांचा निर्धार कायम आहे. ते सच्चे देशभक्त, निर्भय आणि शूर व्यक्ती आहेत. मी त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी शुभेच्छा देते.
सुनीता केजरीवाल यांनी सांगितले की, तुरुंगातील भेटीदरम्यान केजरीवाल यांनी म्हटले की, माझे शरीर तुरुंगात असले तरी माझा आत्मा तुम्हा सर्वांमध्ये आहे. डोळे मिटले तर मला तुमच्या सभोवतीलच अनुभवाल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App