विशेष प्रतिनिधी
इंदापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी तसेच चित्रबलाक, लांब मानेचा करकोचा तसेच ग्रे हेरोन आदी जातींचे पक्षी मोठ्या प्रमाणात आल्याने उजनी लगत पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. Arrival of foreign birds in Ujani Reservoir
उजनी जलाशयामध्ये थंडीच्या हंगामात सायबेरिया येथून फ्लेमिंगो हा पक्षी उजनीच्या पाणलोट क्षेत्रात येतो. या पक्षाला महाराष्ट्रात रोहित पक्षी तसेच अग्निपंख म्हणून ओळखले जाते.
पक्ष्यांचे माहेरघर म्हणून भिगवण जवळील कुंभारगाव ओळखले जाते. कुंभारगाव येथे बोटीमध्ये बसून पक्षी पाहण्याचा आनंद मिळत असल्याने अनेक पक्षी प्रेमींच्या नजरा धरणाकडे लागल्या आहेत. कुंभारगाव येथे पक्षी पाहण्यासाठी पुणे, मुंबई , नाशिक, नागपूर येथून पर्यटक व पक्षीप्रेमी येतात,अशी माहिती स्थानिक पक्षीप्रेमींनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App