पठाणकोट – पठाणकोटपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या रणजित सागर धरणाजवळ लष्कराचे प्रशिक्षणार्थी ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील वैमानिक आणि सह वैमानिकाचा शोध सुरू आहे. Army helicopter crashed in Punjab
ध्रुव हेलिकॉप्टर कोसळण्याची गेल्या सहा महिन्यात दुसरी घटना आहे. या हेलिकॉप्टरची निर्मिती भारतात झाली असून ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टर प्रकल्पातंर्गत तयार करण्यात आले.
लष्कराच्या हवाई तुकडीतील ध्रुव हेलिकॉप्टरने वैमानिकांना कमी उंचीवर उडण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. मामून कॅन्टोन्मेंट येथून सकाळी १०.२० वाजता हेलिकॉप्टरने उड्डाण केले. रणजित सागर धरणावरून हेलिकॉप्टर कमी उंचीवरून जात असताना अचानक हेलकावे खात कोसळले.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे काही अवशेष सापडले असून वैमानिक आणि सह वैमानिकाचा शोध घेतला जात आहे. यासाठी एनडीआरएफ आणि पोलिसांचे बचाव पथक युद्धपातळीवर काम करत आहे. रणजित सागर धरणाची खोली अधिक असल्याने हेलिकॉप्टरच्या ठिकाणांचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App