देशात अँटीबॉडी कॉकटेल लॉन्च, तिसऱ्या लाटेला घाबरू नका ; कोरोनाविरोधी लढाईला मिळणार बळ


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट आली तरी घाबरून जाऊ नका. कारण आता अँटीबॉडी कॉकटेल औषध देशात लॉन्च झाले आहे. त्यामुळे कोरोना विरूद्धाच्या लढाईला बळ मिळणार आहे. Antibody cocktail Drug For Coronavirus Is Launched In India

स्विर्त्झलँडची औषध कंपनी रॉशने अँटीबॉडी कॉकटेल लॉन्च केले आहे. भारतीय सिप्ला कंपनी या औषधाचे वितरण करणार आहे. एका अँटीबॉडी कॉकटेलची किंमत 59 हजार 750 रुपय आहे.



या औषधाची पहिली खेप मिळण्यास सुरूवात झाली आहे. दुसरी जून महिन्यात मिळणार आहे.अँटीबॉडी कॉकटेल हे दोन औषधांचे मिश्रण आहे. त्यात कासिरीविमॅब आणि इमडेविमॅब या दोन प्रमुख औषधांचा समावेश आहे.

दोन्ही औषधांची प्रत्येकी 600 मिलिग्राम मात्रा वापरून अँटीबॉडी कॉकटेल तयार केले जाते. हे कॉकटेल विषाणू मनुष्याच्या कोशिकात जाण्यास रोखतं, त्यामुळे विषाणूला प्रथिनं मिळत नाही आणि तो शरीरात पसरत नाही.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाला , तेव्हा त्यांना हेच अँटीबॉडी कॉकटेल देण्यात आले होते. अमेरिकेत या औषधाला मान्यता मिळाली असून आपत्कालीन उपयोगासाठी भारतात परवानगी दिली आहे.

भारताला दोन लाख औषधांची पाकिटे

एका औषधाच्या पाकिटातून दोन रुग्णांचा उपचार करता येतो. भारताला अँटीबॉडी कॉकटेलचे दोन लाख पाकिटं मिळणार आहे. म्हणजे अँटीबॉडी कॉकटेलचा वापर दोन लाख रुग्णांसाठी करता येणार आहे.

Antibody cocktail Drug For Coronavirus Is Launched In India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात