काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा

अरविंदर सिंग लवली हे आम आदमी पार्टीसोबतच्या युतीच्या विरोधात होते, असे सांगण्यात येत आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अरविंदर सिंग लवली यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी 12 वर्षे शीला दिक्षीत सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या राजकुमार चौहान यांनी तिकीट न मिळाल्याने काँग्रेसचा राजीनामा दिला होता. अरविंदर सिंग लवली हे आम आदमी पार्टीसोबतच्या युतीच्या विरोधात होते, असे सांगण्यात येत आहे.Another big blow to Congress Arvinder Singh Lovelys resignation as Delhi President



लवली यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती प्रदेश काँग्रेसकडून मिळाली आहे. अनेक दिवस ते प्रदेश कार्यालयात येत नव्हते. राजकुमार चौहान यांना उत्तर पश्चिम दिल्लीतून तिकीट न मिळाल्याने ते संतापले होते. लवली यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून राजीनामा पाठवला आहे. ज्यात त्यांनी आपल्या नाराजीचे कारण सांगितले आहे.

अरविंदर सिंग लवली म्हणाले, ‘दिल्ली काँग्रेस युनिट काँग्रेस पक्षावर खोटे, बनावट आणि दुर्भावनापूर्ण भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याच्या एकमेव आधारावर स्थापन झालेल्या पक्षाशी युती करण्याच्या विरोधात होती. असे असतानाही पक्षाने दिल्लीत ‘आप’सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. लवली म्हणाले की, दिल्लीत काँग्रेसला फक्त तीन जागा दिल्या. या तीनपैकी दोन जागा बाहेरच्यांना दिल्याने लवली संतप्त असल्याचेही बोलले जात आहे.

Another big blow to Congress Arvinder Singh Lovelys resignation as Delhi President

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात