आनंद महिंदा हे कायमच त्यांच्या हटके अंदाजामुळे आणि विविध ट्वीट्समुळे चर्चेत असतात.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आपल्या हटके अंदाजाने नेहमीच चर्चेत असणारे महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नुकतेच असे काही केले आहे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी युवा बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद याला कार भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची घोषणा केली, ज्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Anand Mahindra made a big announcement saluting Pragyanands talent
बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताकडून १८ वर्षीय आर प्रज्ञानंदने विश्वविजेत्या कार्लसनला टक्कर दिली. प्रज्ञानंदला हा सामना जिंकता जरी आला नसला, तरी त्याने आपल्या प्रतिभेने केवळ भारतीयांचीच नाही तर संपूर्ण जगभरातील बुद्धिबळ खेळाच्या प्रेमींची मने जिंकली. आज संपूर्ण भारत त्याच्या खेळाला सलाम करत आहे. हे पाहता महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही प्रज्ञानंदला कार भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी सोमवारी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून ही घोषणा केली. त्यांनी प्रज्ञानंदचा आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी ट्विटमध्ये लिहिले- “मी त्या सर्व युजर्सच्या भावनांचा आदर करतो जे मला प्रज्ञानंद यांना थार भेट देण्याची मागणी करत होते. पण मला दुसरी कल्पना आहे. मी पालकांना त्यांच्या मुलांना बुद्धिबळ खेळू देण्यास प्रोत्साहित करू इच्छितो.”
ते पुढे म्हणाले, “हे आपल्या ग्रहासाठी चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासारखे आहे आणि म्हणूनच मला वाटते की आपण प्रज्ञानंदच्या पालकांना XUV4OO EV भेट द्यायला हवी जे आपल्या मुलाच्या उत्कटतेला पाठिंबा देण्यासाठी आमच्या कौतुकास पात्र आहेत”.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App